Eknath Shinde : पंढरपूरच्या आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; शिंदे म्हणाले, कोणाला डावलून..

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on
Summary

राज्यात पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं मागणं मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी मागितलं.

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला साकडं घातलं.

'बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं मागणं मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी मागितलं.

CM Eknath Shinde
Eknath Shinde : विठ्ठलाला साकडं घालताना मुख्यमंत्री 'मविआ'वर बरसले; म्हणाले, पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं..

दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, इथं आल्यावर माझ्याकडं विचारणा झाली की, पंढरपूरच्या विकास आराखड्याचं काय झालं? मी स्पष्टपणे सांगतो की, पंढरपूरचा विकास आराखडा कोणालाही डावलून पुढं करणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होईल.

सर्वांचा विचार करून प्रकल्प पुढं नेले जातील. पंढरपूर विकास आराखडा बनवताना कोणाची नाराजी राहणार नाही यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. आमच्याकडून विविध शासकीय निर्णय घेतले जाताहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत यापुढं दीड लाखांची मर्यादा आता पाच लाखांची असेल असा आजच्या मंत्रिमंडळात ऐतिहासिक निर्णय घेतला.

CM Eknath Shinde
जीवनाचं सार्थक झालं! तब्बल 30 वर्षे पायी वारी करणाऱ्या 'या' दाम्पत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान!

१५ लाख वारकऱ्यांचा एक लाखाचा विमा काढला. सरकार म्हणून हे आमचं कर्तव्य आहे. गेल्या अडीच वर्षाची काम रखडली होती ती आता पुढे सुरू झाली आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोग केला. पंढरपूरच्या रस्त्यासाठी १०८ कोटी मान्यता दिलीये, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rift In Mahayuti
Fuel Price Hike And Shortage Put Farmers In Trouble
solapur
Eknath Shinde announcing development plans for Pandharpur and welcoming new leaders into Shiv Sena.
Marathi News Esakal
www.esakal.com