मुंबई

आधी सणासाठी पैसे दिले; मग कुटूंबालाच वेठबिगारीत अडकविले

सकाळ वृत्तसेवा


भिवंडी : आदिवासी मजुरांची वेठबिगारीची जोखडातून पिळवणूक सुरु असल्याचे विदारक चित्र भिवंडीत समोर आले आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्‍यातील अंजूर या गावातील वीटभट्टी मालकाच्या जोखडातून पाच आदिवासी कुटुंबीयांसह तीन मुलांची सुटका करण्यात यश मिळविले. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालकासह त्याचा मुकादम याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या वीटभट्टी वरील राहुल पवार याच्या अपघाती मृत्यु बद्दल कुटुंबीयांनी संशय घेतला असुन पोलिसांनी सखोलपणे चौकशी करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा ः आधी मैत्रीणीला नेले मीनी-सी शोवर, मग तीला म्हणाले चल घरी जेवायला
गुरूनाथ सवरा, गीता सवरा, वैशाली सवरा, लहु गायकवाड, मंदा गायकवाड आणि त्यांची तीन मुले असे सुटका करण्यात आलेल्या अदिवासी मजूरांची नावे आहेत. वाडा तालुक्‍यातील सिरसाड गावाटेपाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील हे कुटुंब भिवंडी तालुक्‍यातील अंजूर या गावातील जॉली नाईक याच्या वीटभट्टीवर वेठबिगार म्हणून राबत होते. त्यासाठी जॉली नाईक यांचा मुकादम मधुकर पवार याने या कुटुंबियांना गणपती दिवाळी या सणासाठी 15 हजार रुपये आगाऊ देऊन 10 नोव्हेंबर पासून अंजूर गाव येथील वीटभट्टीवर कामासाठी घेऊन गेला असता वीटभट्टी मालक जॉली नाईक याने आपण तुम्हाला भरपूर आगाऊ रक्कम दिली आहे. त्या बदल्यात तुम्ही माझ्याकडे काम करावयाचे असून त्यासाठी आता अधिक पैसे मिळणार नसल्याचे सांगत त्यांना आपल्या वीटभट्टीवर राबवून घेतले. 

दिवसाला केवळ दोनशे रुपये मजूरी 
श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोतीराम नामखुडा, गणपत हिलम, हिरामण गुळवी, जयेंद्र गावित यांचाकडे तक्रार जाताच त्यांनी अंजूर गांव येथे जाऊन या वीटभट्टी मजुरांची भेट घेऊन त्यांच्या कडे विचारपूस केली. तेव्हा या कुंटूंबला वेठबिगार म्हणून राबवून घेत मजुरी म्हणून अवघे दोनशे रुपये देत आठ ते दहा तास काम करून त्यांची पिळवणूक करीत असल्याची खात्री झाली. त्या नंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर घटनेची माहिती देत वीटभट्टी मालक जॉली नाईक व मुकादम मधुकर पवार यांच्या विरोधात गुरूनाथ सवरा यांनी तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार दोघांविरोधात भादंवि कलम 323 सह अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे 3 [I] [H] , बंध बिगार पद्धती उच्चटन अधिनियम 1976 चे कलम 16, 17, 18 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलीस अधिक तपास पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT