आधी मैत्रिणीला नेलं 'मीनी सी-शोर'वर, मग तिला म्हणाले चल घरी जेवायला...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

दोघा तरुणांनी आपल्या ओळखीतल्या 12 वर्षीय मुलीला जेवण करण्याच्या बहाण्याने आपल्या घरामध्ये नेऊन तीच्यावर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबई : वाशी लगतच्या कोपरी भागात रहाणारऱ्या दोघा तरुणांनी आपल्या ओळखीतल्या 12 वर्षीय मुलीला जेवण करण्याच्या बहाण्याने आपल्या घरामध्ये नेऊन तीच्यावर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिन महेंद्र कांबळे (29) आणि राजकुमार भोलाप्रसाद साकेत (26) अशी या दोघांची नावे असून एपीएमसी पोलिसांनी या दोघांवर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. 

जाणून घ्या -  'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ? काय आहे 'लव्ह रूम..'

या घटनेतील 12 वर्षीय पिडीत मुलगी व तीच्यावर सामुहिक बलात्कार करणारे दोघे आरोपी हे कोपरी भागात रहाण्यास असून ते एकमेकांच्या ओळखीतील आहेत. दरम्यान, शुक्रवारी (ता. 10) दुपारी दोघा आरोपींनी पिडीत मुलीच्या 16 वर्षीय मैत्रीणीला फिरण्याच्या बहाण्याने वाशीतील मीनी सी-शोर भागात नेले होते.

मीनी सी-शोर येथे फिरून झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चौघे कोपरी भागात परतले. यावेळी पिडीत मुलीची मैत्रीण आपल्या घरी निघून गेल्यानंतर आरोपी सचिन आणि राजकुमार या दोघांनी पिडीत मुलीला जेवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. त्यानंतर या दोघांनी संधी साधुन पिडीत मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पिडीत मुलीने आरडा-ओरड केल्याने दोघा आरोपींनी पिडीत मुलीला चाकुचा धाक दाखवून तसेच तीला मारहाण करुन तीच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. 

ही बातमी वाचा- ठक-ठक! दरवाजा उघडा, आम्ही तुमच्या मुलांना बेड्या ठोकायला आलो आहोत...

या घटनेनंतर पिडीत मुलगी रात्री 10 च्या सुमारास घरी गेली. मात्र पिडीत मुलीचे आई-वडील हॉस्पीटलमध्ये गेल्यामुळे मुलगी त्यांची वाट पहात घरी थांबली. रात्री उशीरा पिडीत मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तीने तीच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती आपल्या काकांना दिली. त्यानंतर काकाने तीला एपीएमसी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी आरोपी सचिन व राजकुमार या दोघांवर बलात्कारासह पोक्‍सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करुन रात्रीच दोघांना त्यांच्या घरातून अटक केली. 

 12 year old girl raped by two youngsters in Navi Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 year old girl raped by two youngsters in Navi Mumbai