uddhav thackeray sanjay raut sakal
मुंबई

Uddhav Thackeray: मानहानी पडली महागात ; राऊत आणि ठाकरेंना खटल्याला जावे लागणार सामोरे

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

खासदार शेवाळे यांच्या मानहानीप्रकरणी दोषमुक्तीचा केलेला अर्ज महादंडाधिकारी एस. बी. काळे यांनी आज सुनावणीदरम्यान फेटाळला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघांना आता मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वतीने वकिलांनी केलेल्या युक्तिवादात शेवाळेंनी केलेले आरोप मान्य नसल्याचे यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी पुन्हा गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी ठाकरे आणि राऊत यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता.

त्यात त्यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. आपल्याविरोधात कोणताही पुरावा नाही. केलेले आरोपही तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. थोडक्यात, या प्रकरणी आपल्याला गोवण्यात आले असून, या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी ठाकरे आणि राऊत यांच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.

शेवाळे यांच्यातर्फे या मागणीला विरोध करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

याप्रकरणी गुरुवारी निर्णय देताना महान्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांनी ठाकरे आणि राऊत यांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यास नकार दिला. तसेच त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. याबाबत न्यायालयाचा तपशीलवार आदेश नंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

SCROLL FOR NEXT