Manohar Joshi_Uddhav Thackeray 
मुंबई

Uddhav Thackeray meets Manohar Joshi: उद्धव ठाकरे मनोहर जोशींच्या भेटीला; कालच स्पष्ट केली होती भूमिका

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मनोहर जोशींची भेट घेतली होती, त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या घरी निघाले आहेत. जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही शिवसेना नेत्यांची सदिच्छा भेट होणार आहे.

दरम्यान, कालच मनोहर जोशींनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं या भेटीला वेगळं महत्व आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींची भेट घेतली होती, त्यामुळं आता जोशी देखील शिंदे गटात सामिल होणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं होतं. पण खुद्द जोशींनीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना माझं रक्त हे शिवसेनेचं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, उद्धव ठाकरेंचा सहवास मला लाभला आहे. त्यामुळं मी शिवसेनेचाच आहे.

दरम्यान, शिवसेनेत उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रीय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशींचा प्रभाव कमी होत गेला होता. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनोहर जोशी आता शिंदे गटात सामिल होतील अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

हे ही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

जोशींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाकरे कुटुंबिय जोशींच्या घरी गेले आहेत. पण येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांची भेट महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे हे देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT