आता चीन-रशियाची खैर नाही! अमेरिकेनं बनवला B21 अदृश्य महाशक्तीशाली बॉम्बर : US B-21 Bomber | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

US B21 Bomber

US B-21 Bomber: आता चीन-रशियाची खैर नाही! अमेरिकेनं बनवला B21 अदृश्य महाशक्तीशाली बॉम्बर

कॅलिफोर्निया : शत्रूला दिसू न शकणारं अन् अचूक अणुहल्ला करु शकणाऱ्या महाशक्तीशाली B21 बॉम्बर विमानाची पहिली झलक अमेरिकेनं आज दाखवली. कॅलिफोर्नियात पहिल्यांदा जगासमोर अमेरिकेनं हे नव्या जनरेशन हत्यार उघडं केलं आहे.

सहाव्या जनरेशनचं हे विमान लवकरच युएस एअरफोर्समध्ये दाखल होईल. यामुळं अमेरिकेचे पारंपारिक कथीत शत्रू असलेल्या चीन आणि रशियाचं मात्र यामुळं धाबं दणाणलं आहे. (US reveals secretive B 21 bomber in California)

'दि नॉर्थोप ग्रुमन' या कंपनीच्या टीमनं या अत्याधुनिक बॉम्बरची निर्मिती केली असून यातील तंत्रज्ञान आणि अॅडव्हान्स सायन्सेस भविष्यातील वॉरफेअरचं तंत्र मांडत असल्याचं कंपनीचे सीईओ कॅथी वॉर्डन यांनी म्हटलं आहे. B21 रायडर स्टील्थ बॉम्बर नव्या काळाचं तंत्रज्ञान सादर करणार असून शांतता प्रस्थापित करण्याची अमेरिकेची भूमिकाही तो बळकट करतो, असंही त्यांनी पुढं सांगितलं.

दरम्यान, कॅलिफोर्नियातील समारंभात बोलताना अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले, B-21 बॉम्बर अनेक दशके टिकेल. B-21 बॉम्बरला कोणतंही लक्ष्यभेद करण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त वाहनाची गरज भासणार नाही. सर्वात अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली स्टिल्थ विमानं शोधण्याचं तो महत्वाचं काम करेल. B-21 हे आतापर्यंतचं हेरगिरीसाठीचं सर्वात खास बॉम्बर असेल, ज्याची रचना पारंपारिक आणि आण्विक दोन्ही युद्धसामग्री अचूकतेसह डिलिव्हर करण्यासाठी केली गेली आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

यापूर्वी अमेरिकेन एअरफोर्समधील एक अधिकारी डार्लिन कॉस्टेलो यांनी सांगितलं होतं की, B21 कॅलिफोर्नियाच्या पामडेल प्लांट क्रमांक ४२ मध्ये तयार झाली आहे. मूळ योजनेनुसार हे विमान २०२१ मध्येच पहिलं उड्डाण होणार होतं. पण त्यावेळी कोरोनाचा उद्रेक आणि पैशाची कमतरता असल्यानं हा प्रकल्प पुढे ढकलण्यात आला होता.