narayan rane, uddhav Thackeray sakal media
मुंबई

नारायण राणे यांनी प्रत्येक FIR साठी स्वतंत्र याचिका करावी- हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल (cm uddhav Thackeray) वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) प्रत्येक एफआयआरसाठी स्वतंत्र याचिका (FIR Petition) करण्याचे निर्देश आज दिले. राणे यांच्यावर सहा पोलीस ठाण्यात गुन्हे (police case) दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत कानफटवणारे विधान राणे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर राज्यात शिवसैनिकांनी आंदोलने केली आणि राणे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. यामध्ये महाड, नाशिक, पुणे, ठाणे, अहमदनगर आणि जळगाव येथील पोलीस ठाण्याचा समावेश आहे. हे सर्व गुन्हे रद्दबातल करण्यासाठी राणे यांनी एड अशोक मुंदरगी आणि एड अनिकेत निकम यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे.

याचिकेवर आज न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्व एफआयआर साठी स्वतंत्र याचिका केली तर त्यावर सुनावणी घेणे सुलभ होऊ शकते. अभियोग पक्षदेखील प्रत्येक पोलीस ठाण्यातील तपशील स्वतंत्रपणे दाखल करु शकेल, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. राणे यांच्या वकिलांनी याला सहमती दिली. तसेच तोपर्यंत अन्य सर्व प्रकरणात कठोर कारवाई पासून संरक्षण देण्याची मागणी वकिलांनी केली. यापूर्वी नाशिक प्रकरणात पोलिसांनी कारवाई न करण्याची हमी दिली आहे तशीच अन्य प्रकरणात द्यावी, असे मुंदरगी यांनी सांगितले. यावर, प्रथम याचिकेवर सुनावणी घेऊन मग ठरविण्यात येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

राणे यांनी तपासात सहकार्य करण्याची हमी दिली आहे आणि नाशिक पोलीस ठाण्यात ता 25 रोजी हजेरी लावायला त्यांना सांगितले आहे, असे सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी सांगितले. राणे त्यांना सहकार्य करतील आणि व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावतील, असे मुंदरगी यांनी सांगितले. याचिकेवर पुढील सुनावणी ता 30 रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT