राज्यातील सक्रिय रुग्णांच्या यादीत मुंबई चौथ्या क्रमांकावर

मुंबईत 10.86 टक्के सक्रिय रुग्ण
corona virus update
corona virus updatesakal media

मुंबई : राज्यातील सक्रिय रुग्णांच्या (Corona active patients) यादीत मुंबई (mumbai) चौथ्या क्रमांकावर (fourth rank) आली आहे. जी गेल्या एका महिन्याआधी पाचव्या क्रमाकांवर होती. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार (health department report), मुंबईत सध्या 10.86 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात 14 सप्टेंबर पर्यंत 49,671 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या एका महिन्यांच्या तुलनेत कमी झाली आहे. पण, त्यावेळेस मुंबई पाचव्या क्रमाकांवर होती. आता मात्र कोरोना रुग्ण मुंबईत वाढू लागल्याने मुंबई चौथ्या क्रमाकांवर आली आहे. सध्या मुंबईत 5,393 रुग्ण आहेत. त्याआधी राज्यातील पुणे, ठाणे, अहमदनगर, मुंबई आणि सातारा या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.

corona virus update
धक्कादायक ! उल्हासनगर मध्ये तरुणाची दिवसाढवळ्या हत्या

दिवस सक्रिय रुग्ण

 1 ऑगस्ट 78, 962

4 सप्टेंबर 52,025

17 सप्टेंबर 49,671

राज्यात 17 सप्टेंबर 2020 पर्यंत 3 लाख 01 हजार 752 सक्रिय रुग्ण होते. मात्र, दुसऱ्या लाटेत दुपटीने सक्रिय रुग्ण वाढले. 22 एप्रिल 2021 पर्यंत ही रुग्णसंख्या 6 लाख 99 हजार 858 वर पोहोचली. पण, 15 सप्टेंबरपर्यंत 49,671 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

पाच जिल्ह्यांत 74 टक्के सक्रिय रुग्ण

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणारे जिल्ह्यांमध्ये  पुणे, ठाणे, अहमदनगर, मुंबई आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74.73 टक्के रुग्ण हे या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत.  

जिल्हा सक्रिय रुग्ण   टक्केवारी

पुणे - 13,101   26.38 टक्के

ठाणे - 7, 253 14.60 टक्के

अहमदनगर  6,898 13.89 टक्के

मुंबई  5,393 10.86 टक्के

सातारा  - 4, 474 9.01 टक्के

corona virus update
साम टीव्ही आरोग्य संपदा सन्मान 2021; 19 सेवाव्रती देवदूतांचा सन्मान

6 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये

14 सप्टेंबर या दिवशी आढळलेल्या एकूण 49,880 सक्रिय रुग्णांपैकी 3,026 म्हणजेच जवळपास 6.07 टक्के रुग्ण सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. तर, 15.28 टक्के म्हणजेच 7 हजार 620 हे गंभीर अवस्थेत असून या सर्वांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. 2.85 टक्के म्हणजेच 1,294 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 1,732 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर, आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण 4,594 आहेत.

मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये 67.4% वाढ

गेल्या 30 दिवसांमध्ये संपूर्ण मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 67.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 16 ऑगस्टपर्यंत 2,749 सक्रिय रुग्ण होते. 15 सप्टेंबरपर्यंत हेच रुग्ण 4,602 पर्यंत वाढले, याचा अर्थ राज्य सरकारने पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर ही संख्या वाढली आहे. पालिका आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या वाढीसाठी कोविड -19 च्या निकषांचे पालन न होणे आणि सणासुदीच्या काळात झालेल्या हलगर्जीपणालाचे कारण दिले आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉकिंग, सणासुदीच्या वातावरणामुळे ही वाढ झाली आहे. परंतु, रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सर्व वॉर्डांमध्ये कडक दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, काही वॉर्डांमध्ये साप्ताहिक वाढीच्या दरातही वाढ झाली आहे, ज्यामुळे चिंता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com