केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  esakal
मुंबई

Amit Shah: गृहमंत्री अमित शहांमुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द ; वाचा काय आहे कारण ?

Chinmay Jagtap

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (ता. २६) मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमाला येणार आहेत. यामुळे विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सव काळातील सुट्या रद्द करून त्यांना कामावर बोलावण्यात आले आहे.

शहा ज्या दिवशी विद्यापीठात येणार आहेत, त्या दिवशी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहे; तर कार्यक्रम दुपारी चार वाजता असल्याने या कर्मचाऱ्यांना विसर्जनाला मुकावे लागणार असल्याने हा कार्यक्रम इतर कोणत्या दिवशी ठेवायला हवा होता, अशा भावना विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी यांच्यातून व्यक्त होत आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अमित शहा ‘सहकार’ या विषयावर बोलणार आहेत.

शहा हे विद्यापीठात येणार असल्याने विद्यापीठाला सध्या पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. विद्यापीठात सर्वत्र पोलिस आणि इतर यंत्रणांची वाहने लावण्यात आली आहेत. तर उद्यापासून (ता. २२)विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ होणार आहे; परंतु या सर्व व्यवस्थेसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संदर्भात नाही. तो एका खासगी संस्थेचा आहे; मात्र यासाठी कोकणात आणि आपल्या गावी गणपती उत्सवासाठी गेलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांना कामावर बोलवून घेणे उचित नव्हते. त्यासाठी वेगळी यंत्रणा विद्यापीठ प्रशासनाने लावायला हवी होती. मात्र भाजप आणि त्यांच्या समर्थकांच्या हाती विद्यापीठ प्रशासन असल्याने येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत असून, याला विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे.

- प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT