Amit Shah: गृहमंत्री अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

अमित शाहांच्या दौऱ्यासाठीची संपुर्ण तयारी भाजपकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली होती
Amit Shah
Amit ShahEsakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात 16 सप्टेंबरला रोजी येणार होते. मात्र अमित शाहांचा हा औरंगाबाद दौरा आता रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शाह यांचे वेळेचं नियोजन होत नसल्यामुळे, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमित शाहांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून आणि प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यात मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे राज्यातील दौरा वाढले आहेत. अशातच गृहमंत्री अमित शाह यांचा उद्या (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरात दौरा ठरलेला होता. या दौऱ्याची संपुर्ण तयारी करण्यात आली होती.

Amit Shah
RBI Penalty: आरबीआयने चार सहकारी बँकांना ठोठावला दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

या दौऱ्यावेळी गृहमंत्री अमित शाह मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. त्याचबरोबर अमित शाह यांच्या सभेची देखील भाजपकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Amit Shah
Coconut Ganesh : नागपुरात अनोखा बाप्पा! तब्बल 3,000 नारळांपासून साकारली 12 फूट उंच गणेश मूर्ती; पाहा व्हिडिओ

मुक्तिसंग्राम दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते. एमआयडीसी चिकलठाणा भागात अमित शाह यांची भव्य सभा होणार होती. त्यांचा दौरा देखील गृह मंत्रालयाने जाहीर केला होता. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता बिहारमधील दरभंगा विमानतळावरून विशेष विमानाने संध्याकाळी अमित शाह औरंगाबाद विमानतळावर उतरणार होते.

Amit Shah
NCP Crisis: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची आज बैठक; शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?

त्यानंतर कारने ते एमआयडीसी चिकलठाणा भागातील सभेच्या ठिकाणी दाखल होणार होते. संध्याकाळी 5 ते 6.30 या दरम्यान ही सभा होणार होती. त्यानंतर ते विमानतळावरून विशेष विमानाने हैदराबादकडे रवाना होणार होते. सभेसाठी भाजपसह प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली होती. मात्र, आता दौराच रद्द झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com