मुंबई

उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबद्दल वडेट्टीवरांचा मोठा गौप्सस्फोट; जाणून घ्या काय म्हणाले

तुषार सोनवणे

मुंबई - विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदार कोण असतील यावर राजकिय चर्चा सुरू आहेत. त्यात सर्वात जास्त चर्चेत असलेला ग्लॅमरस चेहरा म्हणजे उर्मिला मातोंडकर. परंतु उर्मिलाच्या उमेदवारीवरून माहाविकास आघाडीतच खटके उडतात की काय असे बोलले जात आहे.

विधानपरिषदेसाठी राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून उमेदवारांची नावे पाठवली जाणार आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी विचारणा केली असल्याची माहिती मिळते. उर्मिला यांनी शिवसेनेच्या आमदारकीची ऑफर स्विकारली असल्याचे समजते. परंतु उर्मिला मातोंडकरांच्या आमदारकीच्या मुद्द्यात ट्विस्ट आला आहे. 

कॉंग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतीत म्हटले की, प्रत्येकाला आपला राजकिय निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे उर्मिला यांनी शिवसेनेची ऑफर स्विकारली असावी, कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवावी. हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. कॉंग्रेसनेही उर्मिला यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देऊ केली होती. परंतु तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. तसेच त्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून विधानपरिषदेसाठी नाही असे त्यांनी म्हटल्याचे वडट्टेवारांनी म्हटले आहे.

उर्मिला यांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारली तर मग शिवसेनेची का स्विकारली असा प्रश्न राजकिय विश्लेषकांना पडला आहे. उर्मिला यांनी कॉंग्रेसच्या टिकीटावर लोकसभेसाठी खासदारकीची निवडणूक लढवली होती. तरीही त्यांनी कॉंग्रेसची ऑफर धुडकावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. परंतु या सगळ्यात महाविकास आघाडीत सगळे अलबेल आहे ना? अशा राजकिय चर्चांना उधान आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT