Virar covid hospital fire update ANI
मुंबई

Virar Hospital Fire: १३ मृतांची नावे आली समोर

या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांची नावं आता समोर आली आहेत.

विजय गायकवाड

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील १७ रुग्ण या आगीत अडकले असून अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आता रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरुवात केली आहे. नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये झालेल्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या नावाची यादी आता समोर आली आहे.

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे

उमा सुरेश कनगुटकर- वय ६३ वर्षे

निलेश भोईर- वय ३५ वर्षे

पुखराज वल्लभदास वैष्णव- वय ६८ वर्षे

रजनी आर कडू- वय ६० वर्षे

नरेंद्र शंकर शिंदे- वय ५८ वर्षे

कुमार किशोर दोशी- वय ४५ वर्षे

जनार्दन मोरेश्वर म्हात्रे- वय ६३ वर्षे

रमेश टी उपायान- वय ५५ वर्षे

प्रवीण शिवलाल गौडा- वय ६५ वर्षे

अमेय राजेश राऊत- वय २३ वर्षे

शमा अरुण म्हात्रे- वय ४८ वर्षे

सुवर्णा एस पितळे- वय ६४ वर्षे

सुप्रिया देशमुख- वय ४३ वर्षे

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. यात अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली.

रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळावर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

virar covid hospital fire update names of the 13 people deceased

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

सैराट फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; गर्लफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला निकाह, होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

SCROLL FOR NEXT