मुंबई

दुर्घटनाग्रस्त भानुशाली इमारतीबद्दल मोठा खुलासा, परवानगी देऊनही इमारतीची दुरुस्ती वर्षभर का रखडली? 

अनिश पाटील

मुंबई : म्हाडा आणि महानगरपालिकेने आवश्यक परवानगी देऊनही फोर्ट येथील भानुशाली इमारतीच्या मालकाने इमारत दुरूस्तीसाठी वेळकाढूपणा का केला याबाबतची चौकशी सुरु केल्याचे पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईश फोर्ट येथील भानुशाली इमारतीच्या दुर्घटनेत 10 जणांचा जीव गेला आहे. 100 वर्षाची जुनी असलेली ही इमारत म्हाडाने धोकादायक म्हणून जाहिर केली होती. मात्र तरीही रहिवासी या इमारतीत राहत होते. मुंबई महापालिकेकडून जून 2019 मध्ये आयओडी व सीसी घेतले होते. त्यानंतरही मागील वर्षभरात इमारतीची दुरूस्ती का करण्यात आली नाही, याची चौकशी पालिकेने सुरू केली आहे.

भानुशाली इमारतीच्या दुरूस्तीसाठी इमारत मालक व रहिवाशांचे मागील चार ते पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. इमारत दुरूस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसअ‍ॅप्रूव्हल), नकाशे याची मागणी रहिवाशांनी पालिकेकडे केली होती. 2 जून 2018 रोजी ती प्रदान करण्यात आली होती. तसेच इमारत दुरुस्तीचे काम सुरु करण्याकरीता आवश्यक परवाना 1 जून 2019 रोजी देण्यात आला होता. म्हणजे पालिकेच्या पातळीवर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

त्यानंतरही दुरूस्ती का करण्यात आली नाही, याची चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.  तसेच भाडेकरू रहिवाशांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने 1976 च्या कायद्याच्या कलम 102 नुसार ना हरकत प्रमाणपत्र (विना परताव्यासह) देण्यात येते. या तरतुदीनुसार मालक व  भाडेकरु इमारतीचा सेस न वापरता स्वखर्चाने इमारतीची दुरुस्ती करू शकतात.

म्हाडाने रहिवाशांच्या सुरक्षेबाबतचे हमीपत्रही संस्थेकडून प्राप्त करून घेतले होते. नाहरकत प्रमाणपत्र देताना इमारतीत एकूण 27 निवासी व 31 अनिवासी गाळे होते,असे म्हाडाने स्पष्ट केले होते. दरम्यान इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इमारतीचा ढिगारा पूर्णपणे उपसण्यात आला असून न्यायावैधक प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले आहेत.

( संकलन - सुमित बागुल )

vital information about bhanushali building collapsed reveled in investigation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram Maharaj Palkhi 2026 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; 7 जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान, यंदा वारीत काय असणार विशेष?

Shiroli Toll Naka Accident : शिरोली टोलनाक्याजवळ भीषण अपघात, पुलावरून मोटार कोसळून एक ठार; ३० फुटांवरून मोटार पडली अन्...

दिल्लीनंतर बिहारमध्ये अग्नितांडव, आग लागताच ICUमध्ये रुग्णांना सोडून पळाले कर्मचारी; तिघांचा मृत्यू, २० जण जखमी

IAI Exam Paper leak: ‘नीट’नंतर आणखी एक पेपरफुटी! ‘आयएआय’ परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल, दिल्लीतील क्लासचालकाविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT