wadia hospital 
मुंबई

कोरोना उपचारासाठी 'वाडिया'चा वापर? सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश

सकाळवृत्तसेवा

मुंबई : परळ येथील वाडिया बाल रुग्णालयाचा वापर कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहेत.

मुंबईमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे आणि उपचारासाठी रुग्णालयांची आवश्यकता आहे. अशावेळी परळ येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि वाडिया मॅटर्निटी रुग्णालय ताब्यात घ्यावे आणि तेथे कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरु करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत कॉंग्रेसच्यावतीने पंकज फडणीस यांनी केली आहे. मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेतील मुद्यावर प्रतिवादींची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि रुग्णालय व्यवस्थापनला नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. तसेच वाडिया रुग्णालय आर्थिक अडचणीमुळे वादात सापडले होते. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही प्रलंबित आहेत.

Wadia used for corona treatment? Court directs government to clarify role

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT