mumbai rain 
मुंबई

बापरे! विक्रोळीत कन्नमवारनगर बेस्ट चौकीत शिरले पाणी; वाहक - चालकांचे होतायत हाल.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज सकाळी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे विक्रोळी कन्नमवारनगर येथील बेस्ट चौकीत  पाणी शिरल्याने वाहक व चालक यांचे हाल झाले. सखल भागात असलेल्या या चौकीत पाणी भरत असल्याने बेस्ट वाहक आणि चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेस्ट उपक्रमाकडे याबाबत तक्रार करुनही दुर्लक्ष केले जाते, असा आरोप कामगारांनी केला आहे. 

बेस्ट उपक्रमातील ५०० हुन अधिक कामगारांना कोरोनाची लागण झाली असून १० कामगारांचा मृत्यू झाला आहे. तरीही जीवाची पर्वा न करता कामगार आपली जबाबदारी पार पाडत आहेत. दिवस रात्र सेवा देणा-या कोरोना योद्धा म्हणून बेस्ट कामगारांचे सर्वचस्तरातून कौतुक केले जात आहे. 

मात्र याच कामगारांना सुविधा देण्याकडे बेस्ट उपक्रम दुर्लक्ष करते आहे. कन्नमवार येथे बेस्ट कामगारांसाठी चौकी आहे. या चौकीत सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे पाणी शिरल्याने कामगारांचे हाल होत आहेत. आधीच कोरोनाचा धोका त्यात साचलेल्या पाण्यात लेप्टो, मलेरिया, डेंग्यू अशा विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. 

देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. परंतु बेस्ट उपक्रमाला कामगारांचा विसर पडलेला दिसून येतो. कन्नमवारनगर बेस्ट चौकीत स्वच्छता अभियान कागदावरच असल्याचे दिसून येते. चौकीत पावसाचे पाणी शिरल्याने नीट बसता येत नाही, गुडघाभर पाण्यात बसून रहावे लागते, पिण्याच्या पाण्याची टाकीची दुरवस्था झाली आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी  केली जात आहे.
water filled in best chowki in vikroli read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT