मुंबई

सरकारी यंत्रणा असताना पालकमंत्री कक्षाची गरज काय? दरेकर आणि तटकरेंमध्ये खडाजंगी

सुनिल पाटकर

महाड - रायग़ड जिल्ह्यातील सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी  दिले असुन या विरोधात भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलीच तोफ डागली आहे.

रायगड जिल्ह्यातील दक्षिण भाग तसेच पेण येथे अवकाळी पावसाने  नुकसान झालेल्या भातशेती पाहणीचा दौरा प्रविण दरेकर यांनी केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या निर्णयावर टिका केली. हा निर्णय जनतेच्या हितासाठी  घेण्यात आलेला नाही. तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयात पालकमंत्री कक्ष असला म्हणजे आपल्याला राजकीय दुकानदारी करता येईल या राजकीय उद्देशानेच हे सर्व होत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचा निर्णय धोरणात्मक असता तर सरकारी पातळीवर तो संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आला असता. फक्त एखाद्या जिल्ह्यासाठी असा निर्णय घेता येत नाही.

अन्यथा उद्या प्रत्येक आमदारांच्या मनात आलं तर ग्रामपचांयत आणि पचांयत समिती कार्यालयातही आमदार कक्ष स्थापन केला तर चालेल का असा प्रतिटोलाही दरेकर यांनी लगावला.प्रत्येक तालुक्यात महसूल यत्रंणा असताना राजकीय व्यवस्था उभ्या राहील्या तर राजकीय संघर्ष उभा राहील. लोकांसाठी लोकांमध्ये मिसळून त्यांची दु:ख समजून उपाययोजना केल्या तर अशा कक्षांची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचा निर्णय योग्य वाटत नाही  अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.दरेकर यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचा पाहणी केली शेतक-यांना जास्तीतजास्त मदतमिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी
शेतक-यांना दिली.

राजकारणातील मुरब्बी खा.सुनील तटकरे यावर गप्प बसणारे नव्हते. आपल्या कन्येवर झालेले आरोप फेटाळले. शिवसेनेतून मनसेत व नंतर मनसेतून भाजप त गेलेले प्रविण दरेकर विरोधी पक्ष नेते झाल्यावर आम्ही त्यांचे स्वागतच केले होते. त्यामुळे त्यांनीही पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पालकमंत्री कक्ष स्थापनेचे स्वागत करावे असे प्रत्युत्तर देत दरेकरांना शालजोडीतील दिली.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT