मुंबई

नृत्यदिग्दर्शक 'गणेश आचार्य'विरोधात अदखलपात्र गुन्हा, वाचा काय आहे प्रकरण..

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बॉलीवूडमधील ताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणारा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य याने विनयभंग केल्याची तक्रार एका नृत्य दिग्दर्शिकेने अंधेरीतील आंबोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. आचार्यने जबरदस्तीने पॉर्न व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला असून, राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनेही "मी टू' मोहिमेत आचार्यवर आरोप केले होते.

मोठी बातमी - देशातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही बाजारात, ग्राहकांच्या पडणार खरेदीसाठी उड्या

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, गणेश आचार्य याची 2019 मध्ये इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनच्या (आयएफटीआयसीए) सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. त्यावेळी तो या 33 वर्षांच्या नृत्य दिग्दर्शिकेला संघटनेच्या अंधेरीतील कार्यालयात वारंवार बोलावून घेत असे. कोणत्याही गाण्यासाठी तिने समन्वयाचे काम केल्यास आपल्याला 500 रुपये द्यावे, अशी मागणी त्याने केली होती. त्यावेळी तक्रारदार महिलेने त्याला नकार दिला. तसेच ज्यावेळी तक्रारदार महिला आचार्यच्या कार्यालयात गेली, त्यावेळी आचार्य पॉर्न व्हीडिओ पाहत असायचा. त्याने तक्रारदार महिलेलाही पॉर्न व्हीडिओ पाहण्यास सांगितले होते. असे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर संतापलेल्या तक्रारदार महिला तेथून निघून गेली. त्यानंतर सूड घेण्यासाठी आचार्यने तक्रारदार महिलवर संघटनेमार्फत एक लाखांचा दंडही ठोठावला. त्यानंतर 26 जानेवारीला तक्रारदार महिलेने आयएफटीआयसीएच्या बैठकीमध्ये आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या तेथे गेल्याही. त्यावेळी आचार्यच्या सांगण्यावरून जयश्री केळकर व प्रीती लाड या दोघींनी तक्रारदार महिलेला मारहाणही केली. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरणही झाल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. याबाबत महिलेने अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिला आयोगाकडेही या नृत्य दिग्दर्शिकेनेही तक्रार केली आहे.

women accused choreographer ganesh acharya for making her watch obscene videos

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT