देशातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही बाजारात, ग्राहकांच्या पडणार खरेदीसाठी उड्या 

file photo
file photo

मुंबई : देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सने आपल्या नवीन इलेक्‍ट्रिक वाहन टाटा नेक्‍सान ईव्हीला विक्रीसाठी बाजारात दाखल केले आहे. अतिशय आकर्षक लूक, दमदार इंजिन क्षमता असलेल्या इलेक्‍ट्रिक एसयूव्हीची किंमत केवळ 13.99 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. आकर्षक लुक, आरामदायी तसेच इतर अनेक सुविधा देण्यात येत असल्याने नेक्‍सॉन एसयूव्ही इलेक्‍ट्रिक बाजारात मोठे वादळ निर्माण करणार असल्याचे मत वाहन विश्‍वातील तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. 

टाटा नेक्‍सॉन ईव्ही भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही ठरली आहे. मागील काही दिवसांमध्ये एमजी मोटर्स कंपनीने आपली पहिली इलेक्‍ट्रिक एसयूव्ही एमजी ईझेडएसला बाजारात दाखल केले होते. तीची सुरुवातीची किंमत 20.88 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नेक्‍सॉन ईव्ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही ठरली आहे. 

टाटा नेक्‍सॉनचा आकार 

टाटा नेक्‍सॉन ईव्ही आकाराने अतिशय उत्तम आहे. टाटा नेक्‍सॉनची ही सुधारित आवृत्ती असल्याने यामध्ये अधिक प्रमाणात जागा उपलब्ध करण्यात आली आहे. नेक्‍सॉन ईव्हीची लांबी 3 हजार 995 एमएम, रुंदी 1 हजार 811 एमएम आणि उंची 1 हजार 607 एमएम इतकी आहे. तर यामध्ये 2 हजार 498 एमएमचे व्हीलबेस देण्यात आले आहेत. कंपनीने या एसयूव्हीचा ग्राउंड क्‍लिअरन्सही अतिशय उत्तम दिला असून, 205 एमएमच्या ग्राउंड क्‍लिअरन्समुळे गाडी विनाअडथळा अंतर पार करत राहते. 

इलेक्‍ट्रिक मोटर 

कंपनीने या एसयूव्हीसाठी झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनीने 30.2 किलावॅटच्या क्षमतेचे बॅटरी पॅकचा प्रयोग केला आहे. तर यामध्ये इलेक्‍ट्रिक मोटर्स 129 पीएसची उर्जा आणि 254 एनएमचा टॉर्क निर्माण करते. ही एसयूव्ही केवळ 4.6 सेकंदांमध्ये 60 किलोमीटर प्रति तासचा वेग पकडते. तसेच 9.9 सेकंदांमध्ये ही एसयूव्ही 100 किमी प्रती तास इतका वेग पकडते. 

चार्जिंग 

या एसयूव्हीमध्ये कंपनीने अतिशय उत्तम बॅटरीचा वापर करण्यात आला दावा कंपनीने केला आहे. टाटा नेक्‍सॉन ईव्ही एकदा चार्ज केल्यानंतर 312 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते असा दवा कंपनीने केला आहे. याच्यासह कंपनीने या एसयूव्हीमध्ये सीसीएस2 चार्जिंग प्रणालीचा वापर केला असून, एसी चार्जरने एसयूव्हीला 8 ते 9 तासांत पूर्ण चार्ज करता येते. तर डीसी फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही एसयूव्ही केवळ 60 मिनिटांमध्ये 80 टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करता येते. 

किंमत 

कंपनीने या एसयूव्हमध्ये एकूण तीन व्हॅरीयंट उपलब्ध करून दिले आहेत. तीच्या बेस मॉडेलची किंमत 13.99 लाख रुपये इतकी असून, एक्‍सझेड प्लस व्हॅरीयंटची किंमत 14.99 लाख रुपये तर एक्‍सझेड प्लस लक्‍स व्हॅरीयंटची किंमत 15.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या इलेक्‍ट्रिक एसयूव्हीसाठी 8 वर्ष अथवा 1 लाख 60 हजार किलोमीटर पर्यंत वॉरंटी देण्यात आली आहे. 

tata nexon opportunity for consumers to buy the cheapest electric SUV in the market 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com