Worli Hit And Run CCTV Esakal
मुंबई

Worli Hit And Run: हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर; पाहा अपघाताआधी काय घडले

Mihir Shah: वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी वरळी पोलीस ठाणे येथे मिहिर शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष मसगौंडे

मुंबईतील वरळी परिसरात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला धडक दिली, या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाह नावाचा तरुण त्याची बीएमडब्ल्यू कार चालवत होता आणि त्याच्या शेजारच्या सीटवर दुसरा व्यक्ती बसला होता, जो त्याचा ड्रायव्हर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आरोपीचे वडिल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.

दरम्यान आरोपी मिहीर अपघातापूर्वी एका बारमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

साम टीव्हीच्या हाती लागलेल्या या व्हिडिओमध्ये, बारमधून बाहेर पडल्यानंतर आरोपी मिहीरसह पाचजण बीएमडब्यू कारममध्ये बसताना दिसत आहेत. दरम्यान रविवारी मध्यरात्री सुमारे दिडच्या सुमारास आरोपीसह पाचजण बारमधून बाहेर पडत कारने गेल्याचे दिसत आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शाहसोबत त्याचा चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत (वय ३१) उपस्थित होता. वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी वरळी पोलीस ठाणे येथे मिहिर शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौकशीसाठी राजेंद्रसिंग बिडावत, राजेश शहा ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मिहिर शहा यालाही नंतर अटक केली आहे. यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडचीही पोलिसांनी चौकशी केली. यापूर्वी पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मिहिर शहा हा शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jewelers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

Vaijapur Accident : मोठी बातमी! भोंदू बाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची पाठीमागून जोरदार धडक

Rahul Gandhi : पंतप्रधान आणि मला तर बायकोसुद्धा नाही... ; राहुल गांधी असे काय म्हणाले ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला?

SCROLL FOR NEXT