Worli Hit And Run Case: वरळीत 'हिट अँड रन'प्रकरणातील आरोपीने बारमध्ये पिलं इतक्या हजारांचं मद्य, बिलाचा फोटो व्हायरल

Worli Hit And Run Case: मुंबईतील वरळीत 'हिट अँड रन'ची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये मच्छी आणण्यासाठी निघालेल्या दांपत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने पाठीमागून धडक दिली आणि त्यांना फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे.
Worli Hit And Run Case
Worli Hit And Run CaseEsakal

पुणे पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच मुंबईत देखील ही हिट अँड रनचा प्रकार पुढे आला आहे. मुंबईच्या वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने एका दाम्पत्याला उडवले. यात महिलेचा मृत्यू झाला आहे अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाने रात्री मुंबईच्या व्हॉइस तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली तब्बल 18 हजार रुपयांची दारू या ठिकाणी पिल्यानंतर पहाटे वरळीच्या दिशेने जात असताना बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

आता या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. शहा पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात घडला त्यावेळी त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होते. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता अनेक खुलासे समोर येत आहेत. घटनाक्रमानुसार मिहीर शाह हा रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर याचे बील देखील आता समोर आले आहे.

Worli Hit And Run Case
Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

मद्यप्राशन केल्यानंतर तो घरी गोरेगावला गेला. घरी गेल्या नंतर त्याने आपल्या ड्राइवरला लॉन्ग ड्राईव्हला जाण्यासाठी जायचं असल्याचं सांगितले. नंतर तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला जाताना मिहीर शाह हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी अट्रिक मॉल जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा मिहीर शहा हा मध्यप्रशन केलेला होता. चालक तरूण मुलगा होता. त्याला ताब्यात घेतले आहे. संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

Worli Hit And Run Case
Mumbai Accident : मुंबईत पुन्हा हिट अँड रन! मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला उडवले

वरळी हिट अॅड रन प्रकरणात मिहिर शाहसोबत त्याचा चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत (वय ३१) उपस्थित होता. अपघातानंतर मिहिरचा फोन बंद येत असून त्याचा शोध सुरू आहे. वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी वरळी पोलीस ठाणे येथे मिहिर शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौकशीसाठी राजेंद्रसिंग बिडावत, राजेश शहा ताब्यात घेण्यात आले आहे.

Worli Hit And Run Case
Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

वरळी पोलिसांनी कलम- १०५,२८१,१२५ १,२८१,१२५ (ब), (ब),२३८,३२४ (४) भारतीय न्याय संहिता सह कलम- १८४,१३४(अ),१३४ (ब), १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गाडी मिहिर शाहाच्या नावाने असून मिहिर गाडीचा सेकंड ओनर आहे. अपघातानंतर मिहिर वांद्रे कलानगर येथे गाडी सोडून पळून गेला. वडिलांना सकाळी अपघातानंतर फोन करून घटनेची माहिती दिली. त्याच्यानंतर फोन बंद केला. मिहिर दहावी पास असून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो. पोलिसांची चार पथक महिरचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com