नांदेड : एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप जोडणी sakal
नांदेड

नांदेड : एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप जोडणी

नांदेड परिमंडळातील स्थिती; ‘वसुली तिथे विकास’ उपक्रमास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कृषीपंप वीजग्राहक शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषीपंप धोरणांतर्गत नांदेड परिमंडळातील थकीत वीजबिलातून वसूल झालेल्या ६६ टक्के कृषी आकस्मिक निधीचा वापर करत परिमंडाळातील प्रतिक्षेत असलेल्या एक हजार १४० शेतकऱ्यांना नवीन कृषीपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे.

या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत असलेली विद्युत यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे. तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे. परिमंडळांतर्गत आजपर्यंत कृषीपंपाच्या थकीत वीजबिलाची ५३ कोटी ७४ लाख रूपयांची वसुली करण्यात यश प्राप्त‍ झाले आहे. एक गाव एक दिवस, ग्राहक मेळावे, चावडी बैठका, वीज देयक दुरूस्ती अशा विविध उपक्रमाद्वारे कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीजबील थकबाकीमुक्त अभियानात सहभागी करून घेण्यात आले.

जमा झालेल्या या निधीद्वारे जिल्ह्यातील ६७४ प्रलंबीत असलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील २४८ शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील २१८ शेतकऱ्यांना या निधीचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांसाठी महाकृषी ऊर्जा अभियान ही थकबाकीमुक्तीची सुवर्ण संधी आहे. या योजनेत कृषीपंपधारकांनी सहभागी होत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही त्यांनी पुढे येवून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

महावितरणने दिली शेतकऱ्यांना सूट

नांदेड परिमंडळातील तीन लाख पाच हजार ४५१ शेतकऱ्यांकडे एकूण चार हजार २०२ कोटी ७५ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन व वीजदेयक दुरूस्ती समायोजन सूटद्वारे आता दोन हजार ४९३ कोटी ६३ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. महाकृषी ऊर्जा अभियानात सहभागी झालेल्या ९० हजार २७४ शेतकऱ्यांना ४२५ कोटी ७६ लाख रूपयांची सूट मिळालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT