अकाेला : एसटी काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फूल देऊन स्वागत करू!

कर्मचारी मागण्यांवर ठाम; अधिकाऱ्यांसोबत चर्चा अर्धवट; निघाला नाही तोडगा
एसटी काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फूल देऊन स्वागत करू!
एसटी काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फूल देऊन स्वागत करू!sakal
Updated on

अकोला : आम्ही कोणाला काहीच म्हणणार नाही, कामावर रूजू होणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना विरोध करणार नाही, आगाराबाहेर एसटी काढणाऱ्या कर्मचाऱ्याला आम्ही फूल देऊन स्वागत करू असे, भावनीक शब्द आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी अधिकाऱ्यांसोबत बोलताना दिले. बुधवारी (ता.८) सायंकाळी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे यासाठी आंदोलनकर्त्यांसोबत विभागीय नियंत्रक चेतना खिरवाडकर व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. परंतु, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने अधिकारी चर्चा अर्धवट सोडून कार्यालयात निघूण गेले.

गत ३५ दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर काम बंद आंदोलन चालू आहे. स्थानिक आगार एक व दोन मध्येही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. या काळात कर्मऱ्यांवर निलंबनाच्या कारवायाही झाल्या तरी, खंबीरपणे कर्मचारी आपल्या मागण्या शासनाकडे रेटून धरत आहेत. बुधवारी प्रशासन आणि, कर्मचाऱ्यांमध्ये काही तोडगा निघावा या उद्देशाने प्रशासनाकडून काही अधिकारी आगार दोनमधील आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेला बसले. आपण कामावर रुजू व्हावे, एसटी पूर्ववत सुरू करावी, एसटी बंद असल्याचे काय फायदे आणि, काय तोटे? याबाबत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

एसटी काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फूल देऊन स्वागत करू!
महापालिका- एमएनजीएलचा प्रकल्प न्यायालयीन वादात सापडण्याची चिन्हे

परंतु, प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्ही करत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. जर, आपण इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून एसटी आगाराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी, आंदोलनकर्त्यांमधून कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून त्याला विरोध होणार नाही किंवा त्याला अडचण निर्माण होणार असे कोणतेही कृत केले जाणार नसल्याचे भावनीक उत्तर एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. जवळपार अर्धातास चाललेल्या चर्चेत कोणताच तोडगा निघत नसल्याचे पाहून अधिकारी कार्यालयात निघूण गेले.

आम्ही परिवन मंत्र्यांचेच ऐकत आहोत

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाचे प्रकरण न्यायालयात चालू असल्याने न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत असल्याचे परिवन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसाआधी सांगीतले होते. त्यामुळे मंत्री परब यांनी सांगीतल्यानुसारच आम्हीही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे आणि, निर्णय कोणताही लागो तो आम्हाला मान्य असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com