Universal English School Bus Accident Wasmat Hingoli esakal
नांदेड

Bus Accident : 31 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात; आठ विद्यार्थी जखमी, उपचारासाठी वसमतला दाखल

गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बसमधून काढले बाहेर

पंजाब नवघरे

आजही नवीन चालक पाठविण्यात आल्यामुळंच हा अपघात घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

वसमत : बाभुळगाव ते वाखारी मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी यूनिव्हर्सल इंग्लिश स्कूलची (Universal English School) बस बुधवारी (ता. ९ सकाळी) उलटून झालेल्या अपघातात ८ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

विद्यार्थ्यांना उपचारासाठी आमदार राजू नवघरे यांच्या रुग्णवाहिकेने वसमतला दासरे यांच्या खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. वसमत येथील यूनिव्हर्सल इंग्लिश स्कूलची बस (School Bus) आज सकाळी नेहमीप्रमाणे लहान, लोण, वाखारी या भागातील ३१ विद्यार्थी घेऊन बस वसमतकडे निघाली होती.

बाभुळगाव ते वाखारी मार्गावर एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बाभुळगाव व वाखारी येथील लक्ष्मीकांत नवघरे, नामदेव नवघरे, रामा नवघरे, गोविंद नवघरे, नवनाथ नवघरे, तातेराव कोरडे, गंगाधर ढोरे, गंगाधर बर्वे, सुनील कोरडे, सरपंच गजानन ढोरे, सुनील कोरडे, नारायण कोरडे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले.

आमदार नवघरे यांनी पाठविलेल्या रुग्णवाहिकेतून जखमी हिंदवी कोरडे, अर्जुन कोरडे, शिवम कोरडे, आरती कोरडे (सर्व रा. लहान), आर्या बेटकर, तिरुपती कोरडे (रा. हिवरा), लखन गंगावणे (वाखारी), वसंता कोरडे यांना वसमत येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाकडं पालकांनी यापूर्वी वेळोवेळी चालक बदलला जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही शाळेने त्याकडे दुर्लक्ष केले.

चालकाने घटनास्थळावरून काढला पळ

आजही नवीन चालक पाठविण्यात आल्यामुळंच हा अपघात घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने पालक अधिकच संतप्त झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT