Accident Kandahar Nanded esakal
नांदेड

Nanded News: हृदयद्रावक! गरोदर मुलीला माहेरी आणताना अपघात; बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा वाटेतच मृत्यू

बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणताना दुचाकीचा अपघात झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : कंधार तालुक्यातून (Kandahar Taluka) एक ह्रदयद्रावक घटना समोर आलीये. बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणताना दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(Nanded News)

सोमासवाडीमधील (Kandahar Taluka) रहिवासी असलेले बालाजी किशनराव रासवते (वय 40 वर्ष) हे मुलीला बाळंतपणासाठी उदगीरला आणण्यासाठी गेले होते. उदगीरहून परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक 50 वर असलेल्या पाटोदा खुर्द वळणाच्या ठिकाणी दुचाकी क्रमांक एमएच 25, ए वाय 8226 चा अपघात होऊन बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला.

बालाजी रासवतेंची द्वितीय कन्या राजश्रीचा नांदेडच्या तामसा तालुक्यातील राजेश श्रीमंगले या युवकाशी गेल्या वर्षी विवाह झाला होता. नोकरीच्या निमित्तानं राजेश श्रीमंगले हे आपल्या पत्नीला म्हणजे राजश्रीला घेऊन उदगीर इथं राहत होते. राजश्री ही सात महिन्याची गरोदर असल्यामुळं आपल्या मुलीला आणण्यासाठी बालाजी रासवते सोमवारी उदगीरला गेले.

मात्र, बुधवारी रात्रीच्या वेळी मुलीला परत आणत असताना कंधार तालुक्यातील पाटोदा खुर्द राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रस्त्या लगतच्या खोल खड्ड्यात कोसळल्यामुळं बाप-लेकीचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT