Sammed Shikhar : 'सम्मेद शिखर'ला वाचवण्यासाठी जैन साधूनं दिली प्राणांची आहुती; सुज्ञयसागर महाराजांचं निधन

सुज्ञयसागरजी महाराज सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी 25 दिवसांपासून उपोषणाला बसले होते.
Sugyayasagar Maharaj Passed
Sugyayasagar Maharaj Passed esakal
Summary

सुज्ञयसागरजी महाराज सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी 25 दिवसांपासून उपोषणाला बसले होते.

Sugyayasagar Maharaj Passed Away : झारखंडमधील जैन समाजाचं (Jain Community) तीर्थधाम सम्मेद शिखर (Parshwanath Tirtha) पर्यटनस्थळ म्हणून केंद्र शासनानं घोषित केलं आहे. या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत.

जैन समाजाच्या दृष्टीनं सम्मेद शिखरला विशेष महत्त्व असताना केंद्र शासनानं या तीर्थस्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निर्णयास जैन समाजबांधव, आचार्य, साधू-साध्वी यांच्याकडून विरोध होत आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Sugyayasagar Maharaj Passed
Sangli News: छत्रपती शिवाजी महाराजांचा रातोरात पुतळा हटवला; आंदोलकांची पोलिसांशी झटापट, 30 जणांना अटक

सम्मेद शिखर अर्थात पारसनाथ पर्वतराज हे जैन समाजाचं तीर्थस्थळ आहे. इथं आजवर जैन समाजाचे 20 तीर्थंकर हे मोक्षाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या विरोधात उपोषणावर बसलेले जैन साधू सुज्ञयसागर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलीये.

Sugyayasagar Maharaj Passed
Air India च्या विमानात मद्यधुंद व्यक्तीचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केला लघवी

सांगानेर (जयपूर) येथील जैन मंदिरात साधू सुज्ञयसागर यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी श्रमण संस्कृती संस्थान इथं त्यांना समाधी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगानेर येथील सुज्ञयसागरजी महाराज सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी 25 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. नऊ दिवसांनी म्हणजेच, मंगळवारी सकाळी त्यांनी आपला प्राण सोडला.

Sugyayasagar Maharaj Passed
Crime News : अपमानाचा घेतला बदला; चालकाचा बाप-लेकानं केला गळा दाबून खून, मृतदेह एक्स्प्रेस वे'वर दिला फेकून

वास्तविक, झारखंडमधील गिरीडीह इथं असलेल्या सम्मेद शिखर या पवित्र जैन तीर्थक्षेत्राचा पर्यटनाच्या यादीत समावेश केल्याबद्दल समाजात संताप आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरात निदर्शनं होत आहेत. हे स्थळ पर्यटन स्थळ झाल्यास इथं पर्यटकांकडून नुकसान होण्याची, तसंच धार्मिक भावना दुखावण्याची कृती घडू शकते अशी भावना या समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. झारखंड राज्य सरकार व केंद्र शासनानं हा निर्णय रद्द करावा, यासाठी सकल जैन समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com