Corona-patient Sakal media
नांदेड

नांदेड जिल्हा पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

रविवारी १४७ जण बाधीत; दहा रुग्ण कोरोना आजारातून मुक्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची(nanded corona upadate) संख्या दिवसाला दुप्पटीने वाढत आहे. आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात केवळ पंचवीस ते ३० कोरोनाबाधित रुग्णांवर(covid patients) उपचार सुरु होते. मात्र मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा कोरोनाच्या विळ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. रविवारी (ता.नऊ) प्राप्त झालेल्या एक हजार ३६३ अहवालापैकी १४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दहा रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी आढळून आलेल्या १४७ अहवालामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९० हजार ९८१ इतकी झाली आहे. ८७ हजार ९१७ रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी एकाही गंभीर रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढ्यावर स्थिर आहे.

रविवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये नांदेड वाघाळा महापालिका हद्दीत ८२, नांदेड ग्रामीण १०, देगलूर पाच, मुदखेड तीन, माहूर पाच, धर्माबाद एक, नायगाव दोन, किनवट पाच, अर्धापूर चार, कंधार सहा, भोकर एक, लोहा पाच, उस्मानाबाद एक, परभणी सहा, पणे एक, लातूर एक, हिंगोली एक, पुसद एक, आदिलाबाद एक असे एकूण १४७ बाधित आढळून आले आहेत. नांदेड महापालिका गृहविलगीकरणातील सात, जिल्हा कोविड रुग्णालयातील दोन तर खासगी रुग्णालयातील एक असे दहा रुग्ण बरे झाले आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  1. एकूण बाधित-९० हजार ९८१

  2. एकूण बरे -८७ हजार ९१७

  3. एकूण मृत्यू- दोन हजार ६५५

  4. रविवारी बाधित-१४७

  5. रविवारी बरे- दहा

  6. रविवारी मृत्यू- शून्य

  7. उपचार सुरु-४०९

  8. गंभीर रुग्ण- चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT