आत्महत्या  sakal
नांदेड

नांदेड : सावकाराच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

कळमनुरी तालुक्यात दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी : व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी शेती नावे करून देण्याच्या तगाद्याला कंटाळून मोरवड (ता. कळमनुरी) येथील शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. साहेबराव कोरडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कळमनुरी पोलिसांत बुधवारी (ता. २०) व्याजाने पैसे देणाऱ्या अवैध दोघा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव कोरडे यांनी शेती कामासाठी गावातील दोघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांची सव्याज परतफेड करावी यासाठी संबंधितांनी कोरडे यांच्याकडे पाठपुरावा चालविला होता. पैसे देण्यास उशीर होत असल्यामुळे दोघांनी दोन एकर शेतीची रजिस्ट्री करून देण्यासंदर्भात त्यांच्याकडे तगादा लावला.

त्यातून नऊ ऑक्टोबरला साहेबराव कोरडे व व्याजाने पैसे देणाऱ्या दोघांत शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाली होती. या घटनेच्या मनस्तापातून साहेबराव कोरडे यांनी कळमनुरी येथे विष घेतले. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबादेत हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान १८ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. सिंधूबाई साहेबराव कोरडे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी मोरवड येथील बाबजी सखाराम बेले, चंद्रभान धनवे या संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: वडिलांनंतर आईही गेली, पण अनिमेश हरला नाही; कोचिंगशिवाय UPSCत देशात दुसरा, यशाच्या क्षणी आई-वडील नसल्यामूळे भावूक

Miraj News: आपत्कालीन दरवाजातून उड्या; आठ विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी,चालक-वाहकाची सतर्कता; एसटी थेट पोलिस ठाण्यात नेल्याने प्रकार थांबला

Kolhapur Politics: गोकुळ’साठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली; महायुती म्हणून लढणार, निवडणूक कार्यक्रमाच्या तारखेकडे लक्ष

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Mumbai DahiHandi: मुंबईत ७ वर्षीय चिमुकल्यासह ३४ वर्षांच्या तरुणाचा दहीहंडीवेळी मृत्यू; २३६ गोविंदा जखमी

SCROLL FOR NEXT