कोल्हापूर : विमानतळ विस्तारिकरणाला येणार गती

अधिकाऱ्यांकडून पाहणी; पालकमंत्री सतेज पाटील रविवारी घेणार आढावा
विमानतळ
विमानतळ Canva
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारिकरणासाठी आवश्‍यक असलेल्या ६२ एकर जमिनीत असलेली घरे, कारखाने याची पाहणी आज महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे (भूसंपादन) अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी केली. ही जमीन संपादित करण्यापूर्वी मोजणी खात्याने या जागेत असलेल्या घरे व कारखान्यांची माहिती दिली होती. या माहितीची सत्यता आजच्या पाहणीत पडताळली.

दरम्यान, या पाहणीवेळी पालकमंत्री सतेज पाटील हेही मुंबईहून विमानतळावर दाखल झाले. त्यांनी श्री. नलवडे यांच्यासह करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक घेतली. विमानतळ विस्तारिकरण व सुविधांबाबत रविवारी (ता. २४) शासकीय विश्रामगृहावर बैठक घेणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

विमानतळ
सोलापुरातील तुरुंग कैद्यांनी झाले हाउसफुल्ल

विमानतळ विस्तारिकरणासाठी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ६२ एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. याबाबत कंपनीने मोजणी खात्यांकडून अहवाल मागवला होता. अहवालात या जमिनीत काही घरे, कारखाने असल्याची माहिती मोजणी खात्याकडून दिली होती. या जमीन संपादनासाठी कंपनी पैसे देणार आहे तर कंपनीला महाराष्ट्र शासनाकडून पैसे दिले जाणार आहेत. एकदा जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून या जमिनीत आमचे मोठे घर होते, कारखाना होता अशा स्वरूपाच्या तक्रारी होतात. या तक्रारीच्या अनुषंगाने व मोजणी खात्याने पाठवलेली माहिती खरी आहे का नाही याची पाहणी आज कंपनीचे अपर जिल्हाधिकारी श्री. नलवडे यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.

पुढच्या टप्प्यात या संपूर्ण जमिनीचे व्‍हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर एक नोटीस प्रसिद्ध करून ठराविक तारखेपर्यंत या जागेत असलेल्या बांधकामांनाच भरपाई दिली जाईल अशी सूचना देण्यात येईल. त्यानंतर भरपाई व संपादनाचे काम सुरू होणार आहे. ही प्रक्रिया तातडीने करण्याचे नियोजन असून त्यामुळे विमानतळ विस्तारिकरणाला गती येणार आहे.

विमानतळ
नागपूर : पाल्यांची शाळेतील ने-आण ठरतेय डोकेदुखी

हिवाळी अधिवेशनात निधी

अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू असतानाच विमानतळावर पालकमंत्री सतेज पाटील यांचे मुंबईहून आगमन झाले. त्यांनी या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाहणीसह जमीन संपादनाचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या. या जमीन संपादनासाठी १०० कोटींची गरज आहे, यापैकी किमान ५० कोटी हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur police constable Yogesh Hodage heart attack death
Radhanagari dam water storage latest
Chandrakant Patil latest statement on Sharad Pawar
Hasan Mushrif hospital inspection Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com