Nanded Jalna Expressway
Nanded Jalna Expressway  sakal
नांदेड

नांदेड : द्रुतगती मार्गाचे चार महिन्यांत भूसंपादनाचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड - जालना या प्रस्तावीत द्रुतगती मार्गासाठी अधिग्रहीत करण्यात येणारे भुसंपादन चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. आजतागायत ७७ टक्के जमिनीची संयुक्त पुर्ण झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

नांदेड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे जिल्ह्याचे ठिकाण असून समृद्धी महामार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या नांदेड-जालना द्रुतगती मार्गामुळे या भागाचा सर्वांगीन आर्थिक विकास या मार्गामुळे होणार आहे. जालना-नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी १७९ किलो मिटीर असून ८७ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या ८७ पैकी ६७ गावामधील संयुक्त मोजणी पुर्ण झाली आहे. जालना-नांदेड द्रुतगती मार्गामुळे या दोन्ही शहरामधील २२६ किलोमी मीटरचे अंतर १७९.८ किलोमीटर एवढे होणार आहे. तसेच मुंबई आणि नांदेडच्या दरम्यानचा १२ तासाचा प्रवासही अर्ध्यावर येणार आहे.

परभणी (९३ किलोमीटरचा पट्टा), जालना ६६.४६ किलो मिटर आणि नांदेड १९.८२ किलोमीटर या तीन्ही जिल्ह्यातील आठ तालुक्यातून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावीत जालना-नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैद्राबादला जोडले जाणे अपेक्षित आहे. संपुर्ण ग्रिनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी २२०० हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. रस्ते बांधकामासाठी १४ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. आॅक्टोबर २०२४ पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा संकल्प आहे. हा रस्ता पुर्ण झाल्यास उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळून या पट्ट्यात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.

पुढच्या महिन्यात या मार्गाच्या बांधकाम संदर्भातील टेंडर जारी करण्यात येणार आहे. या कामाला गती देण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तथा कर्मचारी वेगाने काम करीत आहेत. यापूर्वी मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाची निर्मिती करण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे.

''या मार्गामुळे अनेक शेतकरी समृद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे नांदेड-जालना द्रुतगती मार्गावरील शेतकरीदेखील भविष्यात समृद्ध होतील.''

- राधेश्याम मोपलवार, अध्यक्ष, रस्ते विकास महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT