Untimely rain sakal
नांदेड

नांदेड अवकाळीचा दोन हजार हेक्टरला फटका

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान : प्रशासनाकडून प्राथमिक अंदाज

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात ता. २९ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Untimely rain) बिलोली तालुक्यातील एक हजार ९२३ हेक्टरवरील खरिप पिकांचे (Kharif pick) ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याबाबत कृषी आणि महसूलकडून जिल्हा प्रशासनला अहवाल पाठविला आहे.

जिल्ह्यात मंगळवारनंतर बुधवारी (ता.३० डिसेंबर) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. हा पाऊस नांदेड, किनवट, अर्धापूर, बिलोली तालुक्यातील काही मंडळात झाला. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण होते. यामुळे थंडी गायब झाली होती. मंगळवारी (ता. २८ डिसेंबर) किनवट व माहूर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले होते.

यानंतर बुधवारी (ता. २९ डिसेंबर) शिवणी मंडळात १२.३०, नांदेड शहर ८.३०, आदमपूर ८.३०, तरोडा २.८०, बिलोली दोन, नांदेड ग्रामीण १.८०, सगरोळी १.३०, मालेगाव १.३० व दाभड एक मिलीमीटर पाऊस होता. या पावसामुळे बिलोली तालुक्यातील चार हजार १६ हेक्टरपैकी एक हजार ९२३ हेक्टरवरील हरभरा, गहू, रब्बी ज्वारी आदी रब्बी पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने व्यक्त करुन जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

गावनिहाय हेक्टरमध्ये झालेले नुकसान

रामपूर थडी : १६० खतगाव : २४० मुतन्याळ : १५० मिनकी : २७० आदमपूर : १२० हिप्परगा थडी : १४० केसराळी : ३७० जलालपूर : १६० शिंपाळा : १६३ दोलतापूर : १५० हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT