प्रक्रिया उद्योगातून महिला बचतगटांची भरारी sakal
नांदेड

नांदेड : प्रक्रिया उद्योगातून महिला बचतगटांची भरारी

लहान येथील मायावती शेतकरी महिला बचत गटाने आपल्या कार्यकर्तुत्वातून साधली किमया

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरापासून ३० किलोमीटर असलेल्या लहान येथील उच्चशिक्षित शेतकरी महिला संगीता नागनराव इंगळे यांनी मागील तीन वर्षापूर्वी पंधरा महिला एकत्र येऊन शेतीतील वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचे काम हाती घेतले. यासोबतच सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतीमालापासून प्रक्रिया केलेले विविध पदार्थ बनवून शेतीमालाचे मूल्यवर्धन केले आहे. शेती निविष्ठासह दहा प्रकारच्या प्रक्रिया मालाची तयारी करून ते स्वतः विक्री करण्याचे कामही त्या करत आहेत.

अर्धापूर तालुक्यातील लहान येथील संगीता नागिन इंगळे यांनी सेंद्रिय शेती आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये यशस्वी प्रयोग केला आहे. शेतीसाठी रासायनिक खताचा अतिवापर तसेच त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन गावातील पंधरा महिला एकत्र आल्या.

या महिलांना कृषी विभागामार्फत महिला ग्राम संघामार्फत २०१८ मध्ये सेंद्रिय निविष्ठा बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांनी सेंद्रिय निविष्ठासह त्यांच्या भागात पिकणाऱ्या केळी, हळद, मिरची, ज्वारी, उडीद, मूग आदी शेतीमालावर प्रक्रिया करण्याचा निर्धार केला. सध्या या महिला केळी चिप्स, नाचणी लाडू, केळी चिवडा, केळीचे लोणचे, शेंगदाणा लाडू, लाल मिरची पावडर, हळद पावडर, ज्वारीची खडक भाकरी, उडीद पापड, मुग पापड, खोबरे लाडू आधी बनवून शहरासह इतर बाजाराच्या ठिकाणी स्वतः विक्री करत आहेत.

सर्वच महिलांकडे आहे शेती :

बचतगटातील सर्वच महिलांकडे शेती असल्यामुळे कच्चामाल त्यांना स्वतःच्या शेतीत उपलब्ध होतो. या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची मूल्यवर्धन केले आहे. या महिलांनी एकत्र येऊन रासायनिक खताचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांना सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याची प्रेरणा मिळाली. यासोबत सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करत घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निश्चय केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT