Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : गेले दोन दिवसापासून वाढलेली कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून आज राज्यात 17 रुग्ज दगावले.गुरूवारी 50 तर शुक्रवारी 34 रुग्ण दगावले होते. आज 889 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,33,612 झाली आहे. राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,908 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 8,237 इतकी आहे.   

आज 728 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,80,799 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.7 % एवढे झाले आहे.

औरंगाबाद,अकोला,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 5,नाशिक 2,पुणे 2,कोल्हापूर 4,लातूर 4 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 87,522 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1045 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

टॅग्स :Corona updates