nanded sakal
नांदेड

Nanded News : दहा रुपयांचे नाणे अधिकृतच

जिल्हाधिकारी : घेतले नाही तर कायदेशीर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील काही शाखाधिकारी, शासकीय बँका, खासगी बँका, सहकारी बँका दहा रुपयांचे नाणे व्यवहार करण्यासाठी स्विकारत नसल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी दुकानदार, विक्रेते दहा रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा असून हे नाणे स्विकारण्यास नकार देणारे विक्रेते, संबंधीत व्यक्ती यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणी प्रस्तृत करते. या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मुल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाण्यांचे आयुष्य दीर्घकालीन असल्याने, निरनिराळ्या डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यत १४ डिझाईन्समधील दहा रुपयांची नाणी दिली आहेत. त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला निवेदनामार्फत कळविण्यात आले आहे. ही सर्व नाणी वैध चलनात आहेत.

सर्व शाखाधिकारी, शासकीय बँका, खासगी बँका, सहकारी बँका, व्यापारी विक्रेते यांनी दहा रुपयांच्या नाण्यांच्या वापराबाबतचा गैरसमज दूर केला पाहिजे. याचबरोबर बँकानी आपल्या शाखेच्या बाहेर बँनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरुन याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. बँकांनी ग्रामीण भागातील यंत्रणाचा पुरेपुर वापर करुन नागरिकांपर्यत हा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT