Nanded Crime : चोरीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक

एक लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त : तीन गुन्हे उघड
nanded
nandedsakal

नांदेड : नांदेड-लातूर महामार्गालगत लांडगेवाडी जवळ असलेल्या शेतातील घरावर दरोडेखोरांनी (ता.२१ नोव्हेंबर) मध्यरात्री दरोडा टाकून मेहरबान परसराम चव्हाण (वय ६०) व विमलबाई मेहरबान चव्हाण (वय ५५) यांना जबर मारहाण करुन दागिण्यांसह चोरटे पसार झाले होते. या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.तीन) संगमवाडी फाटा (ता.कंधार) येथून अटक केली आहे.

सचिन ऊर्फ बोबड्या बापुराव भोसले (वय २७) असे आरोपीचे नाव, असून त्याच्याकडून एक लाख ४४ हजाराचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सदर प्रकरणात महिलेस गंभीर मारहाण झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथे उपचार चालू होते. या प्रकरणी माळाकोळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्याच्या कलमात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले होते.

nanded
Nanded : मनोज जरांगे यांच्या जिल्ह्यात चार ठिकाणी सभा

दरम्यान, रविवारी (ता.तीन) पथकास मिळालेल्या माहिती वरून संगमवाडी फाटा (ता.कंधार) येथे माळाकोळी येथील पोलिसांची मदत घेवुन सापळा रचला. आरोपी सचिन ऊर्फ बोबड्या बापुराव भोसले (वय २७, रा. कुरुळा ता.कंधार) यास ताब्यात घेतले. त्याने व त्याचा भाऊ धनंजय भोसले (रा. कुरुळा ता. कंधार) यांनी मिळून सदरचा गुन्हा तसेच पोलिस ठाणे लोहा शिवारातील आखाड्यावरील जबरी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील ४४ हजार रुपये किंमतीचे ६०० ग्राम वजनाचे चांदीचे वाळे जप्त करण्यात आले आहेत. तसेच जळकोट पोलिस ठाणे (जि. लातुर) येथील गुन्ह्यातील एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडून माळाकोळी पोलिस ठाणे व जळकोट (जि. लातुर) असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

nanded
Nanded News : स्वच्छता, सुरक्षिततेबाबत तडजोड नकोच - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com