Crime sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime: क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला फेकलं विहिरीत

या मुलाच्या अपहरणाचा बनाव आईने केला होता

सकाळ डिजिटल टीम

सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या बालकास विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाच्या अपहरणाचा बनाव आईने केला होता. खानापूर तालुक्यातील लेंगरे गावामधील ही घटना आहे. शौर्य लोंढे या 6 वर्षाच्या चिमूरड्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

रुपेश नामदेव घाडगे असं प्रियकराचं नाव आहे. तर ज्योती प्रकाश लोंढे असे संशयित आरोपी आईचे नावं आहे. रुपेश आणि ज्योती यांच्यात अनैतिक संबंध होते. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच विहरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात समोर आला आहे. मुलाची आई ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत.

ज्योती हीचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयपणे या लहान मुलाचा काटा काढायचं ठरवलं. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिलं. तक्रार दाखल झाल्यानंतर विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.

दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची केला. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती समोर आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. सध्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT