Missing Girls: चार महिन्यांत जिल्ह्यातील ११९ मुली बेपत्ता; शहर-ग्रामीण पोलिसांत नोंद

४३ मुली अजूनही सापडल्याच नाहीत
Missing Girls
Missing GirlsEsakal

जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ या काळात सोलापूर शहरातील ११७ अल्पवयीन मुली व पाचशेहून अधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलिसांत आढळते. दुसरीकडे ग्रामीणमधील तेराशेहून अधिक मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे दोन वर्षांत बेपत्ता झालेल्यांपैकी साडेपाचशेहून अधिक मुली-महिलांचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यात मागील चार महिन्यांतील ४३ मुलींचाही समावेश आहे.

प्रेमातून विवाहाचे आमिष, हालाखीची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, आकर्षण, पालकांकडून विवाहाला विलंब, न आवडणाऱ्या मुलाशी पालकांनी विवाह ठरवला, अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन व १८ वर्षांवरील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोलापूर शहरातील विशेषतः: एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचे प्रमाण जास्त आढळते.

शहराच्या तुलनेत सोलापूर ग्रामीणमध्ये मुली-महिला बेपत्ता होण्याचे व पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. सोलापूर शहरातून जानेवारी ते एप्रिल २०२३ या काळात ३५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्यातील ११ मुली अजूनही पोलिसांना सापडलेल्या नाहीत. दुसरीकडे सोलापूर ग्रामीणमधून चार महिन्यांत ८४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यातील ३२ मुली अद्याप सापडल्या नाहीत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली.

Missing Girls
Russia Ukraine Crisis: रशियाकडून युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ले; चार नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी

‘ऑपरेशन मुस्कान’ कधी?

विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग यांनी हरविलेल्या व सापडलेल्या बालकांच्या संदर्भात तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक (मबाअप्रवि) यांच्या निर्देशानुसार राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ ही शोध मोहीम दरवर्षी राबविली जाते. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशासकीय संस्था, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड अशा ठिकाणी हरवलेल्यांचा शोध घेतला जातो. पण, कोरोनामुळे या मोहीम सातत्य न राहिल्याने हरविलेले सापडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आता ही मोहीम कधीपासून राबविली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Missing Girls
Manipur Violence: मणिपूरची सुरक्षा, मदत कार्य वाढवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र, राज्याला आदेश

‘भरोसा सेल’ बिनभरोशाचा; ‘महिला’ कक्षाकडे वाढली पेंडन्सी

प्रत्येक पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक, बालके व महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘भरोसा सेल’ अपेक्षित आहे. पण, सद्य:स्थितीत हे सेल कागदोपत्री आहेत, पण त्याठिकाणी अपेक्षित कार्यवाही दिसत नाही. पोलिसांनी समुपदेशनातून अनेकांचे संसार जोडले, पण तक्रारदाराच्या अर्जावर कार्यवाही करताना पती-पत्नीपैकी एकजण जरी गैरहजर राहिला, तरी पुढे काहीच करता येत नाही.

त्यामुळे महिला सुरक्षा कक्ष असो वा भरोसा सेल, यांच्याकडील अर्जांची पेंन्डन्सी दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिस काय करतील, घरगुती भांडणात एवढी काय शिक्षा होणार, दोन पैसे दिले की काही होणार नाही, या आविर्भावात अनेकजण गैरहजर राहतात ही वस्तुस्थिती असून कौटुंबिक छळाला कंटाळूनही अनेकजणी घर सोडून निघून गेल्याचेही बोलले जात आहे.

Missing Girls
LIVE Update: दरड कोसळल्यानं परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com