पश्चिम महाराष्ट्र

मिरवणुक पाहायला जाणाऱ्या युवकावर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा

या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदलगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

चिक्कोडी : ममदापूरहून गळतग्याकडे भरधाव वेगाने जाताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकी खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात ममदापूरचा दुचाकीस्वार ठार झाला. गुरुवारी (16) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना ममदापूर अंबिका मंदिराजवळ घडली. अनिकेत सुरेश यादव (वय 20) असे मृत दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदलगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अनिकेत आपले मित्र संकेत संतोष कदम (वय 22) व लखन चिराप्पा चिंगळे (वय २०) यांच्यासह दुचाकीने ममदापूरहून गळतग्याकडे मिरवणुक पाहण्यासाठी जात होते. गळतगा-ममदापूर रस्त्यावर वसंत पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने जाताना दुचाकीस्वरावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडली. त्यात अनिकेत ठार झाला. संकेत कदम, लखन चिंगळे जखमी असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदलगा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. उपनिरीक्षक रवींद्र आजन्नावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सदलगा पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT