..अन् हांडे कुटुंब हळहळलं; 'राजा'च्या अकाली मृत्यूनं बसला चटका

..अन् हांडे कुटुंब हळहळलं; 'राजा'च्या अकाली मृत्यूनं बसला चटका
Updated on
Summary

खिलार जातीची पैदास वाढावी या हेतूने रेतन प्रक्रियेसाठी त्यांनी पंढरपूर येथून दीड वर्षाच्या खिलार जातीचे खोंड विकत घेतले.

हुपरी : येथील छत्रपती शिवाजी चौकातील गुंडू ऊर्फ सतीश अप्पासाहेब हांडे यांनी पाळलेल्या ‘राजा’ या चार वर्षाच्या खिलार बैलाचा आजारामुळे मृत्यू झाला आणि त्याचे पुत्रवत पालनपोषण करणाऱ्या हांडे परिवाराबरोबरच त्याने लळा लावलेल्या अनेकांना कुटुंबातील एक घटकच हरपल्याची भावना झाली. हांडे यांना बैल पाळण्याची हौस. खिलार जातीची पैदास वाढावी या हेतूने रेतन प्रक्रियेसाठी त्यांनी पंढरपूर येथून दीड वर्षाच्या खिलार जातीचे खोंड विकत घेतले.

..अन् हांडे कुटुंब हळहळलं; 'राजा'च्या अकाली मृत्यूनं बसला चटका
अस्सल गावरान चवीची भोपळ्याच्या पानांची भाजी; एकदा ट्राय कराच

मुलाप्रमाणे आहार-विहार विषयक काळजी घेऊन त्याचे पालनपोषण केले. देखण्या, भारदस्त आणि रुबाबदार शरीरयष्टीमुळे तो उठून दिसायचा. त्याची मारकी प्रवृत्ती नसल्याने त्याचा सर्वांना लळा होता. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी पुसेगाव येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आदत (बिनदाती) गटात त्याने प्रथम क्रमांक पटकावला. तासगाव तसेच अन्य ठिकाणी झालेल्या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात त्याने बक्षिसे मिळवली होती. दोन वर्षापासून कोरोनातही राज्य कृषी प्रदर्शन चॅम्पियन्ससाठी राजाची तयारी सुरू होती. मात्र, कोरोनामुळे स्पर्धा थांबल्याने त्याची चॅम्पियन्सची संधी कायमची हुकली. राजाच्या अकाली मृत्यूने अनेकांना चटका बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khillar cattle farming in Maharashtra
engineering exam
solapur rural police 
The proposal gained attention after the issue was raised in the Legislative Council following a report published by Sakal.
Marathi News Esakal
www.esakal.com