The accused in Wadzire was found 
पश्चिम महाराष्ट्र

वडझिरेतील महिलेला गोळी मारून पळालेला सापडला 

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः वडझिरे येथे गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून महिलेचा खून करणारा प्रमुख आरोपी राहुल साबळे याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणी मावळा (पुणे) येथून अटक केली. 


सुरेश ऊर्फ नटराज सोन्याबापू मापारी (रा. लोणी मावळा) असे त्याचे नाव आहे. मुख्य आरोपी साबळे याच्या शोधार्थ पथके गेल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. 

वडझिरे येथे 17 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी साबळे याने गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून सविता सुनील गायकवाड (वय 35) यांचा खून केला. या गुन्ह्यातील साबळे याचा साथीदार सुरेश मापारी काल (सोमवारी) रात्री लोणी मावळा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लोणी मावळा येथून त्यास ताब्यात घेतले. आरोपी मापारी याने तपासात सांगितले, की जळगाव येथून रजपूत (पूर्ण नाव समजले नाही) याच्याकडून 30 हजार रुपयांना गावठी पिस्तूल आणले.

नगर येथील न्यायालयाने आरोपी मापारी यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Export: भारतीय आंब्यावर बंदी? अखेर नेपाळ सरकारने मौन सोडलं; अफवा फेटाळत कृषी मंत्रालयानं सगळंच सांगितलं!

Loneliest Country: धक्कादायक रिपोर्ट! कुटुंबासोबत राहूनही एकटेपणा का? जागतिक सर्वेक्षणात भारत दुसऱ्या क्रमांकावर

World Cup 2027: 39 वर्षांचा विराट, 40 वर्षांचा रोहित; तरीही 2027 विश्वचषक खेळणार? अश्विनच्या वक्तव्याने रंगली चर्चा

Success Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना मिळतं खूप मोठं यश; पण हातातोंडाशी आलेल्या गोष्टीसाठी करावी लागते खूप धडपड

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'च्या समर्थनार्थ चंद्रकांतदादा, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात आम्हीही मोर्चा काढू; आमदार शिवाजी पाटलांचा सतेज पाटील, शेट्टींना इशारा

SCROLL FOR NEXT