पश्चिम महाराष्ट्र

Video : भारत बंदच्या पार्श्वभुमीवर कऱ्हाडमध्ये तणाव

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः भारत बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातुन आज (बुधवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास युवकांनी रॅली काढुन दुकानदारांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर काही वेळाने हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली काही युवकांनी दत्त चौकातुन बाजारपेठेत पायी चालत दुकानदारांना दुकाने सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होत.

बहुजन क्रांती माेर्चा यांच्यावतीने जाेगेंद्रनाथ मंडल यांच्या जयंती निमित्त साधून सीएए आणि एनआरसीविराेधात आज (बुधवार, ता. 29) भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यास सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. कराड येथे बंदच्या पार्श्वभुमीवर युवकांनी रॅली काढुन दुकानदारांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली काही युवकांनी दत्त चौकातुन बाजारपेठेत पायी चालत दुकानदारांना दुकाने सुरु करण्याचे आवाहन केले. यामुळे काही काळ अशांतता निर्माण झाली. 

हेही वाचा -  गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची चमकदार कामगिरी

कराड शहरातील शांतता कायम राहुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी पावसकर यांना शहरात न फिरण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाजारपेठेतुन चावडी चौकापर्यंत पावसकर कार्यकर्त्यांसह जात असताना दुसऱ्या गटाच्या युवकांनी बॅंक आॅफ इंडिया ते चावडी चौकापर्यंत मोठी गर्दी केली होती. त्यादरम्यान पोलिसांनी तेथे कोणताही अनुचीत प्रकार होवु नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

हेही वाचा -  त्या प्रकरणातून उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता

त्याचबरोबर पोलिस उपाधिक्षक गुरव स्वतः माईकवरुन युवकांना रस्त्यावर गर्दी न करु नये अन्यथा कारवाई करण्याच्या सुचना देत होते. दरम्यान संबंधित चौकात जमलेल्या युवकांना पोलिसांनी पांगवल्यानंतर तणाव काहीसा कमी झाला. त्यानंतरही बंदोबस्त तैनात करण्यात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT