crime from son in ankalkhop sangli marathi news
crime from son in ankalkhop sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

वाद गेला विकोपाला अन् मुलाने भोकसले वडिलांना....

सकाळ वृत्तसेवा

अंकलखोप (सांगली) - येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये मुलाने वडिलांचा घरगुती वादातून धारदार शस्त्राने भोसकून खून केला. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश महादेव वारे (वय ५२) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर संशयित मुलगा किशोर वारे (वय २१) पसार झाला.

ही घटना घडताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी तत्काळ भिलवडी पोलिस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले. याबाबत अधिक माहिती अशी, अंकलखोप (ता. पलूस) येथे विठ्ठलनगर ही पुनर्वसन वसाहत आहे. या ठिकाणी प्रकाश महादेव वारे हे आपल्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून राहतात. प्रकाश वारे शेतमजुरी करीत होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. प्रकाश वारे हे मुलगा किशोरकडेच रहात होते. या दोघांमध्ये कायम किरकोळ घरगुती कारणावरून वारंवर भांडणे होत होती.

किशोर वारे यांची पत्नीही माहेरी गेली आहे. त्यामुळे प्रकाश वारे व किशोर हे दोघेच घरात होते. मंगळवारी सायंकाळी किशोर वारे हा दारू पिऊन घरी आला. त्याचे वडील प्रकाश वारे यांच्याशी किरकोळ कारणावरून जोरदार भांडण सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने धारदार शस्त्राने वडील प्रकाश वारे यांच्यावर सपासप वार केले. वडिलांच्या छातीवर डाव्या बाजूस धारदार शस्त्राचे वार खोलवर झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर किशोर हत्यार घेऊन तेथून पसार झाला. दरम्यान, शेजारील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली असता प्रकाश वारे हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. काही नागरिकांनी तत्काळ भिलवडी पोलिस ठाण्यात दुरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. भिलवडी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वाद विकोपाला गेला

प्रकाश वारे व किशोर वारे या बापलेकांमध्ये वारंवार भांडणे होत होती. हे  त्यांच्या शेजाऱ्यांनाही माहिती होते. मात्र, आज भांडण सुरू असताना कोणीही ते सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि ही घटना घडली. 

पलूस तालुक्‍यात दुसरी घटना

खटाव येथे राष्ट्रवादीचे नेते व माजी सरपंच आनंदराव पाटील यांचा अज्ञातांनी धारदार कोयत्याने डोक्‍यात वार करून खून केला. या घटनेने पलूस तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ माजली. ही घटना ताजी असतानाच पलूस तालुक्‍यातील अंकलखोप येथे मुलाने बापाचा खून केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT