आधी ओरबाडलं गरीबीन; नंतर नराधमानं... 

 Extreme on a little girl in pune
Extreme on a little girl in pune

बेरोजगारी आणि त्यातून होणाऱ्या कुटुंबाच्या उपसमारीला कंटाळून भिमा, बायको, मुलगा रामू व मुलगी भिनुला घेऊन तेलंगणातून पुण्यात आला. काम मिळालं तर पोरांना दोन वेळचं जेवण व शिक्षण देता येईल, या आशेवर त्यानं गाव सोडलं होतं. दरम्यान पुण्यात बांधाकम व्यवसाय तेजीत होता. बांधकाम ठेकेदारांना कामगारांची चांगलीच गरज लागत होती. यातनच भिमा व पत्नी शालूला संजय नावच्या बांधकाम ठेकेदारानं कामावर ठेवून घेतलं. आता कुटुंबाचा भाकरीचा प्रश्‍न मिटला होता. भिमानं मुलगा वासू व मुलगी भिनुला नगरपरिषदेच्या शाळेत घातलं. काही वर्षे निघून गेलीत. भिमा कुटुंबासह पुण्यात थोडफार स्थिरावला होता. बांधकाम ठेकेदार इमारत बांधकामाच्या ठिकाणीच भिमाच्या कुंटुंबाची रहाण्याची व्यवस्था करीत असे. त्यामुळे त्याच इमारतीच्या बांधकामावर मजुरी व राखणदारी दोन्ही भिमा व शालू करीत असत. 2015 मध्ये रामू पाचवीत तर भिनू चौथीच्या वर्गात धडे घेत होती. आपल्या पोरांना विटा-वाळ उचलायला लागू नये, म्हणून भिमा व शालू बांधकाम इमारतीवर गुरासारखी राबत होतीत. दोघांच्या अंगावर कष्टचा भार होता पण रामू अनं भिनुकडे बघून त्यांना समाधान होतं.

सर्वकाही सुरळीत चाललं असताना काही अघटीत घडेल अस भिमाला किंचीतही वाटत नव्हतं. परंतु कधीही न विसरता येणारा तो रविवार उजाडला. सकाळ पासूनच भिनू अन्‌ रामू शाळेला सुट्टी असल्याने इमारतीच्या आवारात चेंडूने खेळत होते. त्यांच्या पत्र्याच्या शेडसमोर उभी राहिलेली सिमेंटची भली मोठी काळी कुट्ट इमारत चिमुकल्या भावंडांना त्यांचं साम्राज्य वाटत असे. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या काना-कोपऱ्यांना भिमाच्या लेकरांचा स्पर्श झालेला होता. त्यामुळं इमारतीत खेळताना भिमाला मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज भासत नव्हती. सकाळची केव्हा दुपार झाली हे खेळात रममान झालेल्या रामू व भिनूला लक्षात आलं नाही. खेळता खेळता रामुनं खालून चेंडू उंचा फेकला तो चेंडू इमारतीच्या तिसऱ्याम मजल्यावर गेल्याचं भिमुनं पाहिलं. भिनुला चेडू आणायला सांगून राम घरात पाणी प्यायला गेला. पाणी पिवून तोंडात चणे टाकीत रामू बाहेर आला पण भिवू अजून चेंडू घेऊन खाली आली नव्हती. रामू तिथंच भिनुची वाट पाहत थांबला बराच वेळ झाल्याने रामू इमारतीच्या तिसऱ्या 
मजल्यावर धावत गेला. तेथील दृश्‍न पाहून रामू थरथर कापू लागला. रामू पळत खाली आला. त्यानं झोपलेल्या भिमाला ओढून उठवलं. रामूला बोलताही येत नव्हतं. रामूच्य संकेतावरून भिमा रामूसह तिसऱ्या मजल्याकडं धावला तिथं मल्लाप्पा भिमुशी जबरदस्ती अतिप्रसंग करीत होता. भिमू विव्हळत होती. भिमानं ते पाहिल्यावर त्यांच्या अंगातून विज गेली. त्यानं मल्लाप्पाला ओढून भिनुपासून बाजूला फेकलं. भिनु वडिलांना बिलगून आकांताने रडू लागली. तोपर्यंत शेजारी जमा झाले होते. त्या साईटवरचा सुपरवायझर संपतही आला. भिमानं सुपरवायझर सोबत जावून मल्लाप्पाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी मल्लाप्पाविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता अन्वये बलात्कार व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये भिनुवर लैंगिक अत्याचर केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. 9 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना गंभीर असल्याने हा खटला द्रुतगती न्यायालयसमोर सुरू झाला. आरोपीवर दोषारोप ठेवताना मल्लाप्पाने गुन्हा केल्याचं न्यायालयात नाकारलं. मल्लाप्पाचे उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून सूड घेण्यासाठी भिमानं त्याला खोट्या केसमध्ये गोवल्याचा बचाव मल्लाप्पानं कोर्टात केला. सुनावणीवेळी भिनु शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापिका साने मॅडम यांची साक्ष घेण्यात आली. त्यांनी शाळेतील रजिस्टर न्यायाधिशांना दाखवले. त्यावर भिनुच्या जन्म तारखेची नोंद होती. त्यावरून भिनु 9 वर्षांची अल्पवयीन असण्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पीडित भिनुची साक्ष झाली. चेंडू आणण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर मल्लापापानं तिला पाठिमागून येवून पकडलं आणि विसस्त्र करून अतिप्रसंग केल्याची साक्ष त्या चिमुरडीने न्यायालयात दिली. त्यानंतर भिमानं व भिनुचा भाऊ रामू यानं साक्षं देवून सरकार पक्षाच्या केसला दुजोरा दिला. त्यानंतर पंच व तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचीही साक्ष घेण्यात आली. त्यामुळंही सरकार पक्षाच्या केसला बळ मिळालं होतं. न्यायालयामध्ये झालेल्या साक्षी पुराव्यावर आणि सरकार पक्षाच्या केसवर आरोपीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप धेतला. मल्लाप्पाला खोट्या केसमध्ये गोवल्याचा आरोप त्यांनी भिमावर केला. तथापी भिनू या अल्पवयीन पिडितेच्या साक्षीला सूज्ञ साक्षीने तसेच रामूच्या साक्षीनं आरोपी मल्लाप्पावरील आरोप सिद्ध होत होते. न्याधिशांनी आरोपीलने मांडलेला बचाव फेटाळून लावला व सरकारच्या पुराव्याला ग्राह्य मानून 21 वर्षीय आरोपी मल्लाप्पाला भिमुवर बलात्कार करून लैंगिक अत्याच केल्याच्या गुन्ह्यासाठी दोषी धरलं. 

अंतत: न्यानिर्णयात भारतीय दंडविधान संहिता कलम वाचण्यात येवून आरोपी मल्लाप्पाला भिनुवरील बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 6 अन्वये तत्कालिन तरतुदीनुसार 10 वर्षे सक्षम कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायालात निकाला एैकताच भिमा व शालू रडू लागले. न विसरता येणाऱ्या त्या अघडटीत घटनेनं त्याचं पुढील जीवन होरपळून गेलं. 

(घटनेतील नावे काल्पनिक असून साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com