crime in jalgaon 
पश्चिम महाराष्ट्र

पीआय साहेबांची मी लव्हरय, तू नीट रहा..नगरच्या महिलेचा जळगावात राडा

सकाळ वृत्तसेवा

नगर/अंमळनेर : नगरच्या कोतवालीतील पोलिस निरीक्षकांच्या प्रेमापोटी केडगावच्या महिलेने जळगावात जाऊन राडा केला. त्यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावत तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. साहेबांसाठी दगंबगिरी करणाऱ्या महिलेविरोधात अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ज्योती धनराज भोई (रा. पैलाड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ज्योती भोई शुक्रवारी (ता. 24) सकाळी सहा वाजता घरात झोपलेली असताना, लाकडी दांडके हातात घेऊन महिला तेथे आली. ज्योतीच्या आईला तिने मैत्रीण असल्याचे सांगितले व ज्योतीला पोलिस निरीक्षक विकास वाघ यांची पत्नी असल्याचे सांगितले. मात्र, ज्योती यांनी, "तू त्यांची पत्नी नाही. मी त्यांना एका कार्यक्रमात पाहिले आहे,' असे सांगितले. त्यावर तिने, आपण वाघ यांची प्रेयसी शबनम ऊर्फ शमिना मोमीन (रा. केडगाव, नगर) असल्याचे सांगितले.

"पोलिस निरीक्षक वाघ यांच्याविरुद्ध नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केलेली तक्रार मागे घे, नाही तर जिवंत मारून टाकीन,' असे सांगून शिवीगाळ केली, तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी व लाकडी दांडक्‍याने ज्योती यांना मारहाण केली. नंतर दुचाकीवरून (एमएच 16 सीएम 7365) ती निघून गेली. तक्रार मागे घेत नाही तोपर्यंत जाणार नाही, असे सांगून, वारंवार घरी येऊन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
अंमळनेर पोलिसांनी शबनम ऊर्फ शमिना हिच्याविरुद्ध अनधिकाराने दुसऱ्याच्या घरात प्रवेश करणे, अश्‍लील शिवीगाळ, मारहाण, जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

IND vs AFG,Test: भारताच्या साडेपाचशे धावा, तरीही अफगाण गोलंदाजाचा डंका; जुरेलला बाद करून काढला वचपा; VIDEO

Latest Marathi News Live Update : देशासह राज्यात 'नो टॉलरन्स फॉर ड्रुग्ज' मोहीम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT