पश्चिम महाराष्ट्र

तब्बल 55 किलोचा फणस; सासऱ्याकडून लाडक्या जावयांना भेट

हा फणस सहजासहजी एका माणसाला उचलत नाही

तानाजी बिरनाळे

मांगूर : राधानगरी तालुक्यातील (radhanagari) सरवडे गावातील ईश्वरा कोळी यांनी अनिल रामचंद्र टोपे, सुनील रामचंद्र टोपे या दोन जावयांना ( son-in-law) प्रेमापोटी तब्बल 54 किलो 810 ग्रॅम वजनाचा फणस शनिवारी (१२) भेट दिला. सध्या मांगूरसह परिसरात याची चर्चा सुरू आहे. जावयांनीही फणसाच्या बियांपासून रोप लागवड करून पर्यावरण समतोल राखण्यास हातभार लावण्याचा संकल्प केला आहे.

आजपर्यंत आपण फणस खूप मोठा असतो, हे ऐकत होतो. पण प्रत्यक्षात 55 किलो वजनाचाही फणस (jackfruit) असतो, हे पाहण्यास मिळाले. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील ईश्वरा कोळी या सासर्‍यांनी कोरोना काळात जावई व मुलींना आपण काय द्यायचे या विचारातून तब्बल 55 किलो वजनाचा फणस भेट दिला आहे. त्याची चर्चा गावात रंगली आहे. मांगूरच्या या जावयांनी सुद्धा सासऱ्याने दिलेल्या प्रेमापोटीच्या फणसातील गोड गर खाऊन न थांबता त्यांनी पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीकोनातून एक संकल्प हाती घेतला आहे.

या फणसातील हजार ते बाराशे बियांपासून फणसाची रोप लागवड करून त्यातील एक रोप प्रत्येकाला भेट म्हणून देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचेही सर्वत्र स्वागत होत आहे. या फणसाचे वजन 54 किलो 810 ग्रॅम असून त्याची उंची 3 फूट लांब तर घेर 4 फूट इतका आहे. हा फणस सहजासहजी एका माणसाला उचलत नाही.

"माझी व भावाची सासरवाडी कोकण भागातील सरवडे आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी सासरवाडीकडून आम्हाला फणस खायला मिळतात. पण यंदा इतका मोठा फणस पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. आम्ही या फणसातील बियांपासून रोप लागवडीचा संकल्प हाती घेऊन त्यातील एक रोप प्रत्येकाला देण्याचा संकल्प केला आहे."

- अनिल रामचंद्र टोपे, जावई, मांगूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT