landslide
landslide esakal
कोल्हापूर

सावधान! 'त्या' 50 गावांत पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका

सुनील पाटील

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक डोंगरांना भेगा पडल्या आहेत. रस्त्यांची अवस्था होत्याची नव्हती झाली आहे.

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५० गावांतील दरड कोसळणे आणि भूस्खलन झाले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ज्या-ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे किंवा भूस्खलन झाले आहे, त्या ठिकाणी अजूनही दरड कोसळण्याचा धोका संभवत आहे. त्यामुळे पन्हाळा, शाहूवाडी तालुक्‍यांतील लोक अजूनही भीतीच्या छायेखाली आहेत. अशा ठिकाणच्या रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून (disaster management) देण्यात आल्या आहेत. (kolhapur)

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक डोंगरांना भेगा पडल्या आहेत. रस्त्यांची अवस्था होत्याची नव्हती झाली आहे. हे दृश्य पाहताना अंगावार शहारे येतात. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, (karvir) राधानगरी, भुदरगड व गडहिंग्लज तालुक्‍यांतील ५० गावांना भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा फटका बसला आहे. अजूनही ही गावे भिंतीच्या छायेत आहेत. जोराचा वारा किंवा पाऊस आल्यानंतर येथील नागरिकांना घरात बसणे धोक्‍याचे वाटू लागत आहे. ज्या-ज्या वेळी भूस्खलन झाले, त्या-त्यावेळी तेथील लोकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा काही लोक डोंगर माथ्याखाली असणाऱ्या घरामध्ये राहण्यास येत आहे. पन्हाळा, शाहूवाडी तालुक्‍यांतील गावांमध्ये भूस्खलनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. यावर जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाय करणे गरजेचे आहे.

यंदा दोन मृत्यू

राधानगरी तालुक्‍यातील (radhanagari) कोनोली व असंडोलीपैकी कुपलेवाडी येथे दरड कोसळल्याने दोन व्यक्तींना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे अशी परिस्थिती ओढवून नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून डोंगर पाथ्याखाली असणाऱ्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धोका असणारी गावे तालुक्यानुसार

शाहुवाडी तालुका : घोळसवडे, पणंद्रे, कासार्डे, कांडवण पैकी आगलावेवाडी, माण पैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसार्ले, लोळाणे, गेळवडे, करंजफेण, मरळे, सावर्डी, शिरोळा मलकापूर, विशागड, भोसलेवाडी, भोसले वाडी, शित्तूर वारूण, कडवे पैकी शिंदेवाडी, पणुंद्रे पैकी हिंगाणेवाडी, उखळू, भेंडवडे, शिरोळ मलकापूर, धनगरवाडा.

पन्हाळा तालुका :
बांदेवाडी डोंगर, पोहाळवावडी दरड, गिरोली जोतीबा, पावनगड, मंगळवार पेठ ते पन्हाळा, आपटी, म्हाळुगे

करवीर तालुका : महे व खुपीरे.

राधानगरी तालुका : कोनोली तर्फ असंडोली, पाटपन्हाळा, गैबी घाट, शिरागाव, सावंतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोतेवाडी, केळोशी बुद्रुक, केळोशी खुर्द, पाल बुद्रक, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, मानबेट, चौके, राऊतवाडी, पनोरी व कासारपुतळे.

भुदरगड - मौजे डेळे पैकी भारमलवाडी

गडहिंग्लज : सामानगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT