भारीच! कोकणवासियांना चाखता येणार आता 'काळ्या तांदळा'ची चव

बारा गुंठ्यामध्ये रुजवात; चारसुत्री पद्धतीचा वापर, हिरवेगार झाले लागवडीचे शेत
Rajapur
Rajapur esakal

राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये तालुक्यातील शेतकऱ्‍यांकडून शेतीतील पिक लागवडीचे नवनवीन यशस्वी प्रयोग केले जात आहे. यावर्षी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 'काळा तांदूळ' या भाताच्या नव्या प्रजातीची शेतकऱ्‍यांनी लागवड केली आहे. त्यासाठी कृषी विभागाने बियाणे उपलब्ध करून दिले असून प्रायोगिक तत्त्वावर 'काळा तांदूळ' (black rice cultivation) भातबियाणे रोपांची चारसुत्री पद्धतीने लागवड केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा तांदूळाची पहिल्यांदा लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील यांनी दिली. (Koakan News)

लहरी पावसासह सातत्याने बदलणाऱ्‍या हवामानाचा भातशेतीवर प्रतिकूल होणारा परिणाम, खर्चाच्या तुलनेमध्ये मिळणारे कमी उत्पन्न आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्‍यांचा शेतीक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. (mansoon in Konkan) अशा स्थितीतही तालुक्यातील शेतकऱ्‍यांकडून शेतीक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विविध लागवडीचे प्रयोग केले जात असून त्यांना काही प्रमाणात यशही मिळताना दिसत आहे.

Rajapur
कोकण रेल्वेवर युतीचा झेंडा; मडगाव रेल्वेस्टेशनवर जल्लोष

प्रयोग यशस्वी होईल...

काळा तांदूळाची बारा गुंठे क्षेत्रामध्ये लागवड केली आहे. यावर्षी पावसाचे कमी-जास्त प्रमाण असले तरी रोपांची चांगली रुजवात आणि वाढही झाली आहे. त्यामुळे काळा तांदुळ लागवडीचा प्रयोग यशस्वी होण्याचा विश्‍वास शेतकऱ्‍यांसह कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे.

* नेहमीच्या तांदळापेक्षा काळ्या तांदळामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर)
* लोह व तांबे या घटकांची मात्रा जादा
* उच्च गुणवत्तेच्या वनस्पती प्रथिनांचा समावेश
* अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक
* शिजवल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा होतो भात
* काळ्या तांदळाच्या भाताच्या सेवनातून हृदयाच्या आरोग्यास संरक्षण

Rajapur
'माझ्यावरील सेट चोरीचा आरोप बिनबुडाचा'; श्रेयस तळपदेने मांडली आपली बाजू

राजापुरातील काळा तांदूळ भाताची लागवड

गाव क्षेत्र (गुंठे) शेतकरी
कोतापूर ३ १
उन्हाळे ३ १
काजिर्डा ३ १
माडबन ३ १

"शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली काळ्या तांदळाची लागवड केली आहे. त्यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि सहकार्य आहे. पहिल्यांदाच पीक घेत असल्याने भातरोपांवर कीड वा रोगाचा प्रादुर्भाव होणार का, किती खर्चामध्ये किती उत्पादन होणार, याबाबत उत्सुकता आहे. चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात पीक घेण्याचा मानस आहे."

- चंद्रकांत जानस्कर, कोतापूर, शेतकरी

Rajapur
कोल्हापुरात तूर, मसूर, उडीद डाळ साठ्यावर निर्बंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com