mushrif esakal
कोल्हापूर

'राजकीय जोडे बाहेर ठेवुन कारखान्याचा कारभार करा'

केसरकर यांच्या अनुपस्थितीचे कारण प्रकृती स्वास्थ आहे. इतरांचे काय हे मला माहीत नाही.

रणजित कालेकर

केसरकर यांच्या अनुपस्थितीचे कारण प्रकृती स्वास्थ आहे. इतरांचे काय हे मला माहीत नाही.

आजरा : आजरा कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अशोक चराटी आणि विष्णुपंत केसरकर उपस्थित नसल्याकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी लक्ष वेधले असता मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘नो कमेंटस’ अशी प्रतिक्रीया दिली. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील चराटी आणि शिंपी गट एकत्र आला आहे. या पार्श्‍वभूमीवर नेते मंडळी काय बोलतात? याबाबत तालुक्यात उत्सुकता होती. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत बोलणे टाळले. दरम्यान, राजकीय जोडे कारखान्याच्या गेट बाहेर ठेवून संस्थेचा कारभार करा, असा सल्ला नेतेमंडळींनी या कार्यक्रमात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला.

कार्यक्रमात देवणे म्हणाले, ‘‘कारखाना सुरु करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेतेमंडळी एकत्र आली. त्यामुळे हा कारखाना सुरु झाला आहे. कारखान्यात यापुढे कोणतेही राजकारण आणू नये.’’ त्यांनी शिंपी, चराटी, केसरकर यांच्या अनुपस्थितीबद्दल लक्ष वेधले. हाच धागा पकडून मुश्रीफ म्हणाले, ‘‘केसरकर यांच्या अनुपस्थितीचे कारण प्रकृती स्वास्थ आहे. इतरांचे काय हे मला माहीत नाही.’’ दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनीही आपल्या भाषणात कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील नेतेमंडळी एकत्री आली की काय होते हे आजरा साखर कारखाना उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडीतील नेते हातात हात घालून विकासाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आजरा कारखाना सुरु होण्यास मदत झाली. हीच भूमिका तालुक्यातील नेतेमंडळींनी कायम ठेवावी.’’ खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांनीही कारखान्याच्या हितासाठी राजकीय मतभेद टाळावे असाच सुर व्यक्त केला.

जेवणाचा डबाही घरातून आणा...

कारखान्याचा कारभार काटकसरीने करा. खर्चात बचत करा. कारखान्याचा चहा देखील घेवू नका. जेवणाचा डबा घरातून आणा असा मौलिक सल्ला मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी कार्यक्रमात दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT