अज्ञात NCB अधिकाऱ्याच्या 'त्या' पत्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर

अज्ञात NCB अधिकाऱ्याच्या 'त्या' पत्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर

मुंबई: नवाब मलिक यांनी आज एक पत्रकार परिषद घेत आणखी काही खुलासे केले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र आल्याचं म्हटलंय. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहेत. अशा केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय. नवाब मलिकांनी हे पत्र ट्विट केलं आहे.

अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र

नवाब मलिकांनी म्हटलंय की, ट्विटरवर एक पत्र मी पोस्ट केलंय. एनसीबीतील एका अधिकाऱ्याने मला पाठवलंय. दोन दिवसाआधी मला ते मिळालंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना देखील ते मी दिलंय. यामध्ये 26 केसेसचा उल्लेख केला गेलाय. कशाप्रकारे पैसे वसूल केली जाते, कशाप्रकारे चुकीची कामे केली जाते, याचा उल्लेख त्या पत्रात आहे. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून हे पत्र मला प्राप्त झालं आहे.

अज्ञात NCB अधिकाऱ्याच्या 'त्या' पत्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर
NCBच्या अज्ञात अधिकाऱ्यांचं 'हे' पत्र; 26 खोट्या केसेसबाबत मलिकांचा मोठा खुलासा

असा आहे पत्रातला मजकूर

  • मी एनसीबीचा एक कर्मचारी असून गेल्या दोन वर्षांपासून मुंबई ऑफिसमध्ये कार्यरत आहे. गृहमंत्री अमित शहांनी Directorate of Revenue Intelligence (DRI) मध्ये काम करणाऱ्या समीर वानखेडेंना out of way DRI मधून लोन बेसिसवर एनसीबीमध्ये झोनल डायरेक्टर पदावर जॉईन केलं.

  • बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज केसेसमध्ये अडकवण्यासाठी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा कार्यरत आहेत. या कलाकारांकडून करोडो रुपये मागून त्यातला काही हिस्सा राकेश अस्थाना यांनाही दिला. वकील अयाज खान यांच्याकडे है पेसे दिले गेले. या कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती व अर्जुन रामपाल यांचा समावेश आहे.

  • समीर वानखेडे एक अटेन्शन सीकर अधिकारी आहेत. खूप निर्दोष लोकांना खोट्या NDPS cases मध्ये अडकवलं आहे. यासाठी वेगळी टीम बनवली आहे. हे लोक एखाद्याच्या घरात तपासणी दरम्यान ड्रग्ज प्लाँट करतात आणि खोट्या केसेस दाखल करतात.

  • जर एखाद्याच्या घरी कमी ड्रग्ज प्राप्त झाले तर ड्रग्जचे प्रमाण न दाखवता अधिक दाखवली जाते, जेणेकरुन जामीन मिळू नये. अशा 26 प्रकरणांची यादी पत्रात दिली आहे.

  • जेंव्हापासून समीर वानखेडे एनसीबी मुंबईमध्ये कार्यभार सांभाळत आहेत तेंव्हापासून जेवढे लोक पकडले गेलेत त्यांच्याकडून 25 कोऱ्या कागदावर सही घेतली गेली असून पंचनामा मर्जीने बदलला जातो. जे अधिकारी या चुकीच्या कामात वानखेडेंना मदत करत नाहीत त्यांना सस्पेंड केलं जातं. आतापर्यंत अशा चार प्रामाणिक अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे.

  • वानखेडे NDPS Act चा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक inquiry commission स्थापन करायला हवी आणि तपास व्हायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com