चित्री प्रकल्प  sakal
कोल्हापूर

kolhapur News : आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प तुंडूंब; सांडव्यातून १८० क्युसेकने विसर्ग सुरू

गतवर्षी हा प्रकल्प ९ ऑगस्टला भरला होता; यंदा हा प्रकल्प चार दिवस आधीच भरला.

सकाळ डिजिटल टीम

आजरा - आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून १८० क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. गतवर्षी हा प्रकल्प ९ आॅगस्टला भरला होता. यंदा हा प्रकल्प चार दिवस आधीच भरला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गडहिंग्लज, आजरा तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

आजरा, गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या या प्रकल्पात २००१ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठ्याला सुरुवात झाली. यंदा उन्हाळा कडाक्याचा असल्याने चित्री प्रकल्पातून आठ आवर्तने झाली.

गतवर्षीपेक्षा तीन आवर्तने अधिक घ्यावी लागली. त्यामुळे चित्री प्रकल्पाने तळ गाठला होता. १५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. गतवर्षी तो २८ टक्के इतका होता. जुलै महिन्याच्या १६ तारखेपासून पावसाची संततधार सुरू असून, चित्री प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली.

२८ जुलैपर्यंत पावसाची संततधार सुरुच राहीली. त्यामुळे चित्री प्रकल्पातील पाण्याची पातळी चौदा दिवसात गतीने वाढली. आज ७१७ मीटर पाणी पातळी असून, १८८६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. पूर्ण क्षमतेने शंभर टक्के धरण भरले आहे. चित्री धरण क्षेत्रात २००० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

उचंगी प्रकल्प ९९ टक्के भरला

चित्री प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने हा प्रकल्प वेगाने भरला आहे. आंबेओहोळमध्ये पाणी येण्याचे प्रमाण कमी आहे.तो आज, रविवारी तुडुंब होण्याची शक्यता आहे. उचंगी प्रकल्प ९९ टक्के भरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT