Kolhapur Rain News : ‘राधानगरी’ चे सर्व दरवाजे बंद अजूनही २२ बंधारे पाण्याखालीच

पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी स्थिर
Radhanagari Dam
Radhanagari Damsakal

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज शहर व परिसरात पुन्हा हजेरी लावली. शहरात भरभूर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाच्या मोठ्या सरी कोसळत राहिल्या. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगेची पातळीही २८ फूट सहा इंचावर स्थिर आहे. गेल्या चोवीस तासांत पंचगंगेच्या पातळीत दोन इंचाची घट झाली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा दरवाजा आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी बंद झाला. त्यामुळे आता धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे बंद आहेत, तथापि वीज केंद्रातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यातील नद्यांची पातळीही स्थिर असल्याने अजूनही २२ बंधारे पाण्याखालीच आहेत.

Radhanagari Dam
Sangli News : ‘ओबीसी’साठी मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना

आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र धुवाँधार पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत हातकणंगलेत २.४, शिरोळमध्ये १.१, पन्हाळ्यात ७.५, शाहूवाडीत १२.३, राधानगरीत १४, करवीरमध्ये ६.९, कागलमध्ये ४.७, गडहिंग्लजमध्ये ३.२, भुदरगडमध्ये १६.२, आजऱ्यात ९.८, तर चंदगडमध्ये ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Radhanagari Dam
Ambabai Mandir Kolapur : आजच्या नव्या रुपातल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं घरबसल्या घ्या दर्शन

पाण्याखालील २२ बंधारे

पंचगंगा नदीवरील ः शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदीवरील ः तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.

वारणा नदीवरील ः चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, कोडोली, खोची व शिगाव.

दुधगंगा नदीवरील ः दत्तवाड

कासारी नदीवरील ः यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे

धरणांचा पाणीसाठी असा- (आकडे टीएमसीमध्ये, कंसात एकूण क्षमता)

  • राधानगरी ८.२६ (८.३६१)

  • तुळशी २.५२ (३.४७१)

  • वारणा २८.८९ (३४.३९९९)

  • दुधगंगा २०.२० (२५.३९३)

  • कासारी २.५८ (२.७७४)

  • कडवी २.५२ (२.५१६)

  • कुंभी २.४० (२.७१५)

  • पाटगाव ३.२८ (३.७१६)

  • चिकोत्रा १.२० (१.५२२)

  • चित्री १.८९ (१.८८६)

  • जंगमहट्टी १.२२ (१.२२३)

  • घटप्रभा १.५६ (१.५६०)

  • जांबरे ०.८२ (०.८२०)

  • आंबेओहोळ १.२२ (१.२४०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com